वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरा देवी इथं पहिल्यांदा भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरा देवी इथं नंगारा भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. बंजारा समाजाच्या बोली भाषेत उपस्थितांशी संवाद साधला. बंजारा समाजाच्या धार्मीक कार्यात वाजवला जाणारा नगारा वाजवून त्यांनी नंगारा भवनाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचा निधी जमा झाल्याची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिरात पूजा केली. शनिवारी पी. एम. मोदींनी मंदिर परिसरात पोहोचून विधीवत पूजा केली आणि देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला. पूजेदरम्यान मोदींनी मंदिराच्या प्रांगणात उपस्थित ढोलही वाजवला. बंजारा समाजातील लोकांसाठी हे मंदिर खास असून पोहरादेवीच्या जगदंबा मातेवर त्यांची नितांत श्रद्धा आहे. देवीच्या विशेष पूजा आणि आरतीमध्ये ढोल वाजवणे हा एक अनिवार्य विधी आहे आणि जेव्हा मंदिरात लोकांच्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा ते ढोल वाजवून आनंद साजरा करतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते विरासत-ए-बंजारा या वस्तू संग्रहालयाचं लोकार्पण करण्यात आलं. जगभरातील बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे कोट्यवधी रुपये खर्चून बंजारा समाजाचा आजवरचा संपूर्ण इतिहास दर्शविणारे विरासत-ए-बंजारा वास्तू संग्रहालय उभारण्यात आलं आहे. त्याचं लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आलं.
बंजारा समाजाला पुरातन काळापासून गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. त्याची नव्या पिढीला माहिती व्हावी, यासाठी श्री क्षेत्र पोहरादेवी येथे १३ गॅलरींचं भव्यदिव्य असं नगाराच्या प्रतिकृतीमध्ये ‘विरासत ए बंजारा’ वस्तूसंग्रहालय (म्यूझियम) उभारण्यात आलं आहे. त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर रोजी मोठ्या थाटात झालं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, आमदार, खासदार आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा..