ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2024 : आरक्षणावरुन गाजणार आगामी निवडणूक ?: मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे संभ्रम - Assembly Election 2024

Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणूक 2024 ही आरक्षणाच्या मुद्द्यावर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन रान पेटलं आहे. मात्र आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरुन मतदारांचा संभ्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Assembly Election 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 20, 2024, 5:16 PM IST

छत्रपती संभाजीनगर Assembly Election 2024 : राज्यात आरक्षणाच्या सुरू असलेल्या वादातून नवनवे राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात एकीकडं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अपक्ष उमेदवार निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय तर दुसरीकडं वंचित बहुजन पक्षानं 100 ओबीसी आमदार निवडून आणण्याचा निश्चय केलाय. त्यामुळे विधानसभा निवडणुका लागण्याच्या आधीच राजकीय गणितावर चर्चांना उधाण आलं आहे. पुन्हा एकदा विकासाच्या नाही, तर जातीच्या आधारावर मतदान होणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मनोज जरांगे 180 उमेदवार करणार उभे : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गेल्या वर्ष भरापासून समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. उपोषण, आंदोलन, मोर्चे काढूनही सरकार मागणी मान्य करायला तयार नाही. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात आरक्षणाच्या मागणीचा परिणाम दिसून आला अन् अनेक दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला. आंदोलनात कोणाला पाडायचं ते ठरवणार असं म्हणत विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला. उपोषण करुन फायदा नाही, आता निवडणुकीत धोबी पछाड द्यायची. जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आणि विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावर लढायचं. सत्ताधाऱ्यांना थेट समोर बसून प्रश्न विचारायचा, अशी घोषणा त्यांनी केली. त्यासाठी मनोज जरांगे यांनी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला. अनेक इच्छुकांनी अर्ज केले, मराठवाडा, नाशिक भागात एका जागेसाठी कुठं दहा, तर कुठं पंधरा पेक्षा जास्त जणांनी उमेदवारी मागितली आहे. 180 जागांवर उमेदवार देण्याची रणनीती आखली जात आहे, अशी माहिती मनोज जरांगे यांनी आपल्या कार्यक्रमांमध्ये अनेकवेळा दिली आहे.

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात : "मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं, तर एका समाजावर अन्याय होईल," असं म्हणत वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढली. पहिल्या टप्प्याचा समारोप करत असताना 100 ओबीसी आमदार असा नारा देण्यात आला. आरक्षण वाचवायचं असेल, तर विधानसभेत संख्याबळानुसार 100 ओबीसी आमदार असायला हवेत. त्यामुळे विचार करा, अन्यथा परिणामाला तयार रहा, अशी चेतावणी या यात्रेतून मतदारांना देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेते आणि राज्य सरकारमधील प्रमुख पक्ष असलेला भाजपा मनोज जरांगे यांच्या भूमिकेला विरोध करत आहे. निवडणुकीत ओबीसी एकत्र नाही आलं, तर आरक्षण जाईल, अशी भीती निर्माण केली जात असल्यानं, प्रत्येक निवडणुकीत हिंदू - मुस्लिम असा भेद करत निवडणूक लढवली जाते. मात्र यंदाची निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

  1. महाविकास आघाडीचा आर या पारचा नारा : "एक तर तू राहशील किंवा मी राहीन...", आघाडीनं फुंकलं विधानसभेचं रणशिंग - Maharashtra Assembly Election 2024
  2. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लांबणीवर; निवडणूक आयोगानं सांगितलं 'हे' कारण - Dates For Assembly Elections
  3. जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार, 4 ऑक्टोबरला लागणार निकाल - Assembly Election 2024 Schedule

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.