ETV Bharat / state

ईव्हीएम दुचाकीवरुन नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या गोंधळानंतर पोलीस संरक्षणात नेल्या मशीन - AMRAVATI ASSEMBLY ELECTION 2024

अमरावती विधानसभा निवडणूक 2024 मध्ये गोपालनगर मतदान केंद्रावर प्रचंड राडा झाला. एका कर्मचाऱ्यानं एव्हीएम मशीन दुचाकीवर नेण्याचा प्रयत्न केल्यानं संतप्त नागरिकांनी चांगलाच गोंधळ घातला.

Amravati Assembly Election 2024
पोलिसांच्या निगराणीत ईव्हीएम मशीन नेताना (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2024, 9:40 AM IST

अमरावती : निवडणूक प्रक्रिया आटोपल्यावर मतदान केंद्रावरील ईव्हीएम चक्क दुचाकीवरून कर्मचाऱ्यांनी नेण्याचा प्रयत्न करताच परिसरातील नागरिकांनी गोंधळ घातला. या प्रकारात एका कर्मचाऱ्यानं चक्क ईव्हीएम रस्त्यावरच पाडली, यामुळे गोंधळ वाढला. काही क्षणातच ईव्हीएम दुचाकीवरुन नेल्या जात असल्याच्या अनेक अफवा पसरल्या. या संपूर्ण प्रकारानंतर निवडणुकीतील उमेदवार मतदान केंद्रावर धावून आलेत. यानंतर प्रचंड राडा झाला. सायंकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू असणारा हा गोंधळ रात्री अकरा वाजता शांत झाला आणि त्यानंतर मतदान केंद्रावरील ईव्हीएम या पोलीस संरक्षणात नेण्यात आल्या. हा संपूर्ण प्रकार अमरावती शहरात बडनेरा मतदार संघात येणाऱ्या गोपाल नगर येथील भारतरत्न राजीव गांधी विद्यालय या मतदान केंद्रावर घडला.

असं आहे प्रकरण : विधानसभा निवडणुकीसाठी बडनेरा मतदारसंघात गोपाल नगर परिसरात भारतरत्न राजीव गांधी विद्यालय या मतदान केंद्रावर दिवसभर शांततेत मतदान प्रक्रिया आटोपली. दरम्यान या मतदान केंद्रावरील सहापैकी चार मतपेट्या या मतदान केंद्रापासून काही अंतरावर मुख्य रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनात देण्यात आल्या. यानंतर उर्वरित दोन मतपेट्या या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दुचाकीवर ठेवून मुख्य रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरातील काही नागरिकांनी मतपेट्या अशा दुचाकीवर नेण्याच्या प्रकारासंदर्भात आक्षेप घेतला. यावेळी काही तरुणांनी चक्क मतपेट्या दुचाकीवरून नेणाऱ्या कर्मचाऱ्यास मारहाण केली. यावेळी एक मतपेटी रस्त्यावर पडली. या संपूर्ण प्रकारानंतर परिसरातील काही मंडळींनी मतदान केंद्रावरील मतपेट्या पळविल्या जात आहेत, अशी माहिती राजकीय मंडळींना दिली. यानंतर आमदार रवी राणा यांच्या समर्थकांसह बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तुषार भारतीय आणि प्रीती बंड या कार्यकर्त्यांसह मतदान केंद्रावर पोहोचल्या. यानंतर बराच वेळपर्यंत मतदान केंद्रावर राडा सुरू होता.

मतदान केंद्र परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप : या संपूर्ण प्रकारानंतर गोपाल नगर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाच्या वतीनं गोपाल नगर येथील मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला. पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या नेतृत्वात गोपाल नगर परिसरातील मतदान केंद्रावर पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला.

उमेदवारांनी जाणून घेतली नेमकी परिस्थिती : मतदान केंद्रावर पोहोचलेले रवी राणा समर्थक भाजपाचे माजी नगरसेवक सुनील काळे, अपक्ष उमेदवार तुषार भारतीय आणि प्रीती बंड यांनी वातावरण काहीस शांत होताच नेमका काय प्रकार घडला आहे, हे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुषार भारतीय आणि सुनील काळे यांचं मतदान केंद्रप्रमुखाच्या स्पष्टीकरणानं समाधान झाल्यानं ते निघून गेले. प्रीती बंड आणि त्यांचे समर्थक मात्र बराच वेळपर्यंत मतदान केंद्रावर होते. उपविभागीय अधिकारी अनिल भटकर आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे रिटर्निंग ऑफिसर विवेक जाधव हे मतदान केंद्रावर पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन प्रीती बंड यांच्याशी चर्चा केली. एकूणच कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे हा संपूर्ण गोंधळ उडाला, यामागं कुठलाही अनुचित हेतू नसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यावर प्रीती बंड यांचा संताप देखील मावळला.

रिटर्निंग अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण : "या मतदान केंद्रासाठी एक वाहन निश्चित करण्यात आलं होतं. त्या वाहनाद्वारे या मतदान केंद्रावरील चार ईव्हीएम या बचत भवन येथे पोहोचवण्यात आल्या. एक ईव्हीएम मात्र या ठिकाणीच होती. आता प्रीती बंड यांनी जो काही आक्षेप घेतला होता, त्या संदर्भात आम्ही या मतदान केंद्रावरील पडताळणी त्यांना करून दिली. ज्या चार ईव्हीएम निवडणूक साहित्य संकलन केंद्रावर पोहोचवण्यात आल्या, त्यांची देखील पडताळणी प्रीती बंड यांना आम्ही करून देणार आहोत. ज्या कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावरील ईव्हीएम या दुचाकीवर नेण्याचा प्रयत्न केला, त्या संदर्भात चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होईल," असं बडनेरा विधानसभा मतदारसंघातील रिटर्निंग अधिकारी विवेक जाधव यांनी स्पष्ट केलं.

पोलीस बंदोबस्तात नेली ईव्हीएम : सायंकाळी सात वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत गोपाल नगर परिसरात ईव्हीएम प्रकरणावरून प्रचंड राडा झाला. दरम्यान ईव्हीएम दुचाकीवरून नेण्यासंदर्भात आक्षेप घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना प्रशासनाच्या वतीनं वास्तविक परिस्थिती लक्षात आणून दिली. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावरील ईव्हीएम बचत भवन येथील निवडणूक साहित्य संकलन केंद्रात पाठवण्यात आली. यावेळी काही तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. वातावरण चिघळू नये याकरिता पोलिसांच्या वतीनं काळजी घेण्यात आली.

हेही वाचा :

  1. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार; 'एक्झिट पोल'नुसार स्पष्ट बहुमत, MVA नं दिली 'टाईट फाईट'
  2. विधानसभा निवडणूक 2024 : मुंबईत सर्वात कमी, तर नक्षलग्रस्त गडचिरोलीत विक्रमी मतदान, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील मतदान ?
  3. वृद्धांमध्ये मतदानाचा उत्साह; आजीनं स्ट्रेचरवरून बजावला मतदानाचा हक्क

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.