ETV Bharat / state

आता नीट परीक्षेत घोटाळा? गुणांमध्ये प्रचंड वाढ; पालकांकडून परीक्षा घेणाऱ्या ‘एनटीए’वर शंका, पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी - NEET exam scam - NEET EXAM SCAM

NEET exam scam : देशभरात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरता घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला आणि हा निकाल जाहीर झाल्यावर देशातील तब्बल एक नव्हे दोन नव्हे तर ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहे. अनेक मुलांना जास्तीचे गुण मिळाल्याने विद्यार्थी तसंच पालकांनी नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करुन परीक्षेवर शंका उपस्थित केलीय. पुन्हा नीट परीक्षा घेण्यात याव्या, अशी मागणी केली आहे.

NEET Exam Scam
पालक आणि विद्यार्थी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 7:47 PM IST

पुणे NEET exam scam : मागच्या वर्षी २०२३ मध्ये झालेल्या नीट परीक्षेत केवळ दोन विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले होते. यंदा देशात २४ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असताना देखील तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहे. तर या परीक्षेत दोन वर्ष अभ्यास करूनही ६५० पेक्षा अधिक गुण मिळालेल्या मुलांना देखील प्रवेश मिळणार नाही. विद्यार्थी तसेच पालकांकडून यावर आक्षेप घेत नीट परीक्षेत गोंधळ तसंच घोटाळा झाला असल्याचा आरोप या मुलांकडून करण्यात येत आहे. तर पालकांकडून आता झालेली नीट परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. यंदा अचानक गुणांमध्ये झालेली तफावत पाहता पालकांकडून 'एनटीए'वर शंका उपस्थित केली जात आहे.

नीट परीक्षेविषयी पालकांच्या शंका जाणून घेताना ईटीव्ही प्रतिनिधी (ETV Bharat Reporer)

अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगले : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), केंद्रीय विद्यापीठांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच अभिमत विद्यापीठांमध्ये एमबीबीएस, बीडीएस आणि बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी नीटची परीक्षा घेण्यात येते. यात देशभरातून सुमारे २४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५ लाख ४७ हजार ३६ विद्यार्थी आणि ७ लाख ६९ हजार २२२ विद्यार्थिनी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत. यातील खुल्या गटातून ३ लाख ३३ हजार ९३२, ओबीसीतून ६ लाख १८ हजार ८९०, एससीतून १ लाख ७८ हजार ७३८, एसटीतून ६८ हजार ४७९ आणि ईडब्ल्यूएसमधून १ लाख १६ हजार २२९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. देशातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या शासकीय आणि खासगी अशा एकूण ५४९ महाविद्यालयांच्या ७८ हजार ३३ जागांसाठी प्रवेश दिला जातो. मात्र, उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगले आहे.

पालकांकडून पुन्हा परीक्षेची मागणी : याबाबत विद्यार्थी म्हणाले की, आम्हाला या परीक्षेत ६०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत आणि रँक हा जवळपास ७० हजार आला आहे. म्हणून शासकीय तर सोडा पण सेमी शासकीय महाविद्यालय मिळणार की नाही याबाबत शंका वाटत आहे. एवढा पण पेपर सोप्पा नव्हता की, एवढे कटऑफ आणि मार्क मिळतील. म्हणून मला शंका वाटत आहे. म्हणून परीक्षेत घोटाळा झाला असल्याचं आमचं म्हणणं आहे. कारण मागच्या वर्षी तर मुलांना एवढे मार्क मिळाले नसते. जी यंत्रणा परीक्षा घेण्यासाठी राबवण्यात आली आहे त्याच्यावरच आक्षेप असून ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी आमची मागणी आहे. यावेळी पालक म्हणाले की, मुलांनी खूप चांगली स्वप्नं बघितली होती आणि तसा अभ्यास देखील केला होता. मुलांना चांगले गुण मिळूनही शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. आमच्या मुलांचं खूप नुकसान झालं असून या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहे. आम्हाला पुन्हा परीक्षा हवी असल्याचं यावेळी पालकांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. साखरेच्या पट्ट्यात शेतकऱ्याने फुलवली सफरचंदाची बाग, चिंचपूरच्या शेतकऱ्याची किमया - Apple Farming Shirdi
  2. जळगाव जिल्ह्यातील तीन वैद्यकीय विद्यार्थ्यांचा रशियाच्या नदीत बुडून मृत्यू, एकाला वाचवण्यात यश - Indian Students Drown In Russian River
  3. उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्याचे भाजपाचे प्रयत्न; शिवसेनेचे सहा आमदार करणार घरवापसी? - Lok Sabha Election Results 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.