ETV Bharat / state

अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचा परिचारिकेवर बलात्कार; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न - Palghar Crime - PALGHAR CRIME

Palghar Crime News : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील डेंगाची मेट ग्रामपंचायतीचे सरपंच आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष कमळाकर धूम याच्याविरोधात बलात्कार केल्याचा गुन्हा जव्हार पोलिसांनी दाखल केलाय. वाचा सविस्तर बातमी...

Palghar Crime News
अजित पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्षाचा परिचारिकेवर बलात्काराचा (Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 3:47 PM IST

Updated : May 4, 2024, 5:22 PM IST

पालघर Palghar Crime News : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील डेंगाची मेट ग्रामपंचायतीचे सरपंच आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष कमळाकर धूम याच्याविरोधात एका परिचारिकेवर बलात्कार केल्याचा आणि लग्नाचं आमिष दाखवून तिचा संसार मोडल्याचा गुन्हा जव्हार पोलिसांनी दाखल केलाय.

अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षाशी ओळख : जव्हार तालुक्यातील 27 वर्षीय परिचारिका कंत्राटी पद्धतीनं काम करत होती. तिच्या उत्पन्नावर तिच्या कुटुंबाचा खर्च चालत होता. कंत्राटी पद्धतीनं काम करत असताना तिला पगार कमी होता. तिला कुणाच्यातरी ओळखीनं आणि वशिल्यानं परिचारिका म्हणून कायम नोकरी मिळेल असं सांगण्यात आलं. त्यावेळी तिची ओळख कमळाकर महादू धूम याच्याशी झाली. तो डेंगाची मेट गावचा सरपंच असून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा जिल्हा कार्याध्यक्ष असल्यानं त्याच्या अनेक ओळखी असल्यानं पीडीत महिलेची त्याच्याशी ओळख झाली होती.

मनोर येथील हॉटेलमध्ये बलात्कार : धूम याच्या ओळखीनं आपल्याला सरकारी नोकरीत कायम होता येईल, असं तिला वाटलं. त्यामुळं या परिचारिकेनं त्याच्याशी ओळख वाढवली. त्याचे पालघर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्यानं नोकरीसाठी ते मदत करतील असं तिला वाटलं. या ओळखीचा फायदा घेत धूम यानं या परिचारिकेला बोरसेपाडा येथील बसस्थानकावर बोलवून घेतलं. त्यानंतर मनोर टेन नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये तो या परिचारिकेला घेऊन गेला. तुझ्याशी बोलायचं आहे असं सांगून त्यानं हॉटेलच्या रूममध्ये नेलं. त्यानंतर तू मला आवडतेस. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, असं त्यानं सांगितले. दोघांचीही लग्न झाले असल्याचे तिने निदर्शनास आणताच तुझ्या नोकरीचं कामही करतो आणि तुझ्याशी लग्नही करतो, असं सांगत त्यानं तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यानं तिच्याशी आठ-नऊ वेळा बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नाचे आमिष दाखवून आणि नोकरी लावून देण्याचे तो वारंवार सांगत असे, काम होण्याच्या आशेनं ती वारंवार त्याच्या शिकारीला बळी पडत होती.

जव्हार इथंही बलात्कार : ही परिचारिका माहेरी असताना कमळाकर जव्हार इथंही आला आणि त्यानं तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले. त्यांचं असं वागणं तिच्या पतीला खटकले. संशय आल्यानं पतीनं तिचा मोबाईल नकळत काढून घेऊन त्यांच्यातील कॉल रेकॉर्डिंग तपासले असता त्यातून तिचं पतीशी भांडण झालं. ती माहेरी आली असता पतीनं माहेरी येऊन तिच्या विवाहबाह्य संबंधाची तिच्या माहेरच्यांना माहिती दिली. कमळाकर धूम याच्याशी संबंध असल्यानं पतीनं तिला नांदवण्यास नकार दिला. तिनं ही बाब कमळाकरला सांगितली असता पतीला सोडचिट्टी दे, तुझ्याशी लग्न करतो असं सांगितलं व पतीला लग्नाचा खर्च म्हणून त्यानं दोन लाख रुपये दिले. त्यानंतर मात्र त्यानं तिच्याकडूनच दोन वेळा मिळून एक लाख सत्तर हजार रुपये घेतले. दोघांच्या भेटीगाठी चालूच होत्या. त्यातच तिची डहाणू तालुक्यातील आशागड इथं बदली झाली. त्या ठिकाणी रुम घ्यायची असल्यानं डिपॉझिट भरावं लागणार होतं. तिनं कमळाकरला फोन करुन डिपॉझिटची रक्कम मागितली. दुसऱ्या दिवशी डिपॉझीटची रक्कम देण्याचं त्यानं मान्य केलं. त्याबाबत या परिचारिकेनं कमळाकरला मोबाईलवर मेसेज पाठवला. हा मेसेज कमळाकरच्या पत्नीनं पाहिला.

"याबाबत जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल." - संजय ब्राम्हणे, पोलीस निरीक्षक, जव्हार

पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न : कमळाकरनं या परिचारिकेला माझ्या घरी आलीस, तर आत्महत्या करीन अशी धमकी दिली. त्यानंतर त्यानं कॉल बंद केले. अनेकदा संपर्क करुनही तो उत्तर देत नव्हता. त्यामुळं अखेर ही परिचारिका आशागड इथून निघाल्यावर मध्येच कासा इथं उतरली. कासा येथील बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या झेरॉक्स सेंटरमधून कागद घेऊन त्यावर कमळाकरच्या कारनाम्याचा तपशील लिहिला. दरम्यान, तिनं चिठ्ठीचे फोटो काढून ते भावाला पाठवले. तशाच स्थितीत ती डेंगाची मेट येथील बसस्थानकावर उतरुन कमळाकरच्या घरी गेली. तिथं तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र घराच्या बाहेर बसली असतानाच ती बेशुद्ध पडली. नंतर तिच्या भावानं तिला जव्हार येथील कुटीर रुग्णालयात दाखल केलं. धूम याच्या फसवणुकीमुळं तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला. आता तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा :

  1. हॉल तिकीट आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; बदनामीच्या भीतीनं केली आत्महत्या, आरोपींना पोलीस कोठडी
  2. लग्नात काम करणाऱ्या मुलीवर तंदूर बनवणाऱ्या मुलांचा बलात्कार; कसंबसं सुटका केली अन्....
  3. अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी मेहुण्याला फाशीची शिक्षा - Minor Sister in Law Murdered

Last Updated : May 4, 2024, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.