ETV Bharat / state

वाघाची दहशत कायम; मेळघाटात वाघाच्या हल्ल्यात युवक ठार - TIGER ATTACK

मेळघाटमधील केसरपूर गावात रविवारी वाघानं (Tiger) केलेल्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं परिसरात पुन्हा एकदा वाघाची दहशत पसरली आहे.

Tiger Attack
वाघाच्या हल्ल्यात युवक ठार (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2024, 7:47 PM IST

अमरावती : महाराष्ट्रात वाघांची (Tiger) संख्या झपाट्याने वाढत आहे. तर मेळघाटातील मानव आणि वन्य प्राण्यांमधील संघर्ष काही नवीन नाही. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसाल लगत केसरपूर येथील युवक हरिराम धिकार हा जंगलात बांबू तोडण्यासाठी गेला असता, त्याच्यावर वाघानं हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात हरिराम धिकारचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीच्या दिवसात घडलेल्या या घटनेमुळं मेळघाटात खळबळ उडाली आहे.

अशी आहे घटना : हरीसाल वनवर्तुळ अंतर्गत येणाऱ्या केसरपूर गावातील रहिवासी असणारे हरिराम धिकार हा युवक रविवारी सकाळी बांबू तोडण्यासाठी जंगलात गेला होता. घनदाट जंगलात बांबू तोडत असताना त्या ठिकाणी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघानं अचानक त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात हरिराम धिकारचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हरिराम अधिकारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

शासनाकडून 25 लाख रुपये मदतीचा आश्वासन : आज बडनेराचे आमदार रवी राणा यांनी धारणी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हरिराम धिकारच्या मृतदेहाची पाहणी केली. तसंच त्यांनी त्याच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. मेळघाटातील भाजपा उमेदवार आणि माजी आमदार केवलराम काळे, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर हे देखील धारणी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले होते. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या हरिराम धिकारच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची मदत शासनाकडून मिळवून देण्याचं आश्वासन आमदार रवी राणा यांनी यावेळी दिलं.

वाघाच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू : 7 जानेवारी 2024 रोजी कारवा जंगलात वाघाने एकाला ठार केले होते. यानंतर 27 फेब्रुवारी 2024 रोजी आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर 14 मार्च ते 14 एप्रिल 2024 याकाळात या वाघानं आणखी दोघांना ठार केले होते.

हेही वाचा -

  1. मेळघाटात अनेकांनी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री घेतला निसर्ग अनुभव, कोणाला दिसला वाघ तर अनेकांना दिसले रानगवे - Melghat Tiger Reserve
  2. Man Animal Conflict 2023 : राज्यात मनुष्य आणि वन्यजीव संघर्षात वाढ; वर्षभरात 100 जणांनी गमाविले प्राण
  3. Buddha Purnima Nature Experience: बुद्ध पौर्णिमेचा 'निसर्ग अनुभव' झाला महाग; वन्यजीव प्रेमी झाले नाराज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.