ETV Bharat / state

लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांना लाडकी बहीण आठवली - पृथ्वीराज चव्हाण - Prithviraj Chavan Vs Ajit Pawar - PRITHVIRAJ CHAVAN VS AJIT PAWAR

Prithviraj Chavan : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन आजही राजकारण सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत नुकतंच एक वक्तव्य केलं. याला कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, दहा वर्ष त्यांना लाडकी बहीण आठवली नाही. लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांना लाडकी बहीण आठवली.

Prithviraj Chavan Vs Ajit Pawar
अजित पवार विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 9, 2024, 6:40 PM IST

पुणे Prithviraj Chavan : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाडकी बहीण योजनेचे पुढील हफ्ते पाहिजे असतील तर विधानसभेला आम्हाला मतदान करा, असं म्हटलं आहे. यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले, "आता त्यांना त्याशिवाय काहीही दिसत नाही. दहा वर्ष त्यांना लाडकी बहीण आठवली नाही. लोकसभेच्या निकालानंतर त्यांना लाडकी बहीण आठवली, ही चांगली गोष्ट आहे. ही योजना आम्ही कर्नाटकमध्ये यशस्वीरित्या राबवली आहे. तसंच तेलंगाणात देखील ही योजना आम्ही राबवली आहे." आम्ही काय करणार आहे हे आमच्या जाहीरनाम्यात कळेल, असं यावेळी चव्हाण यांनी सांगितलं.

पृथ्वीराज चव्हाण हे अजित पवारांवर टीका करताना (ETV Bharat Reporter)

जागावाटपाबाबत निश्चिती नाही : रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी लिहिलेल्या 'हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे?' या पुस्तकाचं प्रकाशन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जागावाटपाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारलं असता ते म्हणाले, "याबाबत जाहीररित्या सांगता येणार नाही. कालपासून जागावाटपाबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे. बंद दाराच्या आत जागावाटपाबाबत चर्चा होत आहे. आम्ही आमचं आकलन करत आहोत. जेव्हा आमचं ठरेल तेव्हा आम्ही नक्कीच याबाबत सांगू".

मुख्यमंत्र्याच्या 'चेहऱ्याबाबत' काय म्हणाले चव्हाण : मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारलं असता ते म्हणाले, "महाराष्ट्राची परंपरा आहे की, एखादा मुख्यमंत्री जर निवडणुकीला सामोरे जात असेल तर त्याचा चेहरा हा आपोआप मुख्यमंत्री म्हणून पुढे केला जातो. विरोधक म्हणून जेव्हा निवडणुकीला सामोरे जातो आणि बहुमत मिळते तेव्हा ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतात. त्या पक्षाचा मुख्यमंत्री हा होत असतो. ही साधारणतः पद्धत असते. आता आम्ही विरोधात निवडणूक लढवत असल्यानं आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवणं योग्य नाही."

हिंदूंना खतरा कोणापासून : भारतातील हिंदू हा संकटात असून प्रत्येकानं दोन मुलं जन्माला घातली पाहिजेत, असं विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारलं असता ते म्हणाले, "मला हे समजत नाही की हिंदूला कोणापासून खतरा आहे. जर मुस्लिम समाजापासून खतरा आहे, असं म्हणत असाल तर देशात हिंदूंची संख्या मुस्लिमांपेक्षा सहा पटीने जास्त आहे."

हेही वाचा :

  1. लोकशाहीच्या मार्गानं महायुती सरकार घालवणार - संजय राऊत - Sanjay Raut On MVA
  2. वक्फ विधेयकाच्या चर्चेवेळी ठाकरेंच्या खासदारांचा संसदेतून काढता पाय? राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू - Waqf Amendment Bill
  3. "...तर मी त्यावेळी पूर्ण पक्षच सोबत घेवून आलो असतो"; अजित पवारांचं शिंदे-फडणवीसांसमोर मोठं विधान - Ajit Pawar On Eknath Shinde

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.