ETV Bharat / state

भाजपाचा प्रवास, दोन खासदार ते तीन वेळा सत्ता, जाणून घ्या सविस्तर इतिहास - History Of BJP - HISTORY OF BJP

BJP Foundation Day : 1980 मध्ये भारतीय जनसंघातून भाजपाचा जन्म झाला. सुरुवातीला 1984 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ दोन खासदार देशात निवडून आलेल्या या पक्षाने त्यानंतर 1999 आणि 2014 ते 2024 अशी तीन वेळा सत्ता मिळवली. 400 पार उद्दिष्ट ठेवलेल्या भाजपा काय आहे प्रवास जाणून घेऊया त्यांच्या स्थापना दिनानिमित्त.

BJP Foundation Day
भाजपा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 11:01 PM IST

मुंबई BJP Foundation Day : आज (6 एप्रिल) भाजपाचा स्थापना दिवस आहे. 1980 मध्ये 6 एप्रिल रोजी भाजपाची स्थापना झाली. त्या लावलेल्या एका रोपट्याचे काही वर्षांनी एवढं मोठं झाड होईल असं क्वचितच कुणाला वाटलं होतं. आज परिस्थिती अशी आहे की, 2024 च्या आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा 370 जागांवर आणि एनडीए आघाडी 400 हून अधिक जागांवर विजयाचा दावा करत आहे. भाजपाचे विचार उद्दिष्ट आणि केलेली विकासकामे यामुळेच हे शक्य झालं, असा दावा भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

जनसंघापासून सुरुवात: भारतीय जनसंघाच्या स्थापनेपासून भाजपाचा प्रवास पाहिला पाहिजे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी हिंदू महासभेचा राजीनामा दिला. 21 ऑक्टोबर 1951 रोजी त्यांनी संघाच्या सहकार्याने बीजेएसची स्थापना केली. मुखर्जी यांचा काश्मीर तुरुंगात मृत्यू झाला. यानंतर उपाध्यक्ष चंद्रमौली शर्मा यांना जनसंघाचे अध्यक्ष करण्यात आले. त्यांच्यानंतर प्रेमचंद्र डोगरा, आचार्य डीपी घोष, पीतांबर दास, ए रामाराव, रघु वीरा, बच्छरास व्यास यांनी जनसंघाची जबाबदारी सांभाळली. 1966 मध्ये बलराज मधोक आणि 1967 मध्ये दीनदयाल उपाध्याय अध्यक्ष झाले. त्यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी 1972 पर्यंत आणि लालकृष्ण अडवाणी 1977 पर्यंत अध्यक्ष पदावर राहिले.

जनसंघाची अखेर : 1977 मध्ये भारतीय जनसंघाचे अस्तित्व संपुष्टात आले. खरे तर यावेळी देशात प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले. अशा स्थितीत जनता पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी विलीनीकरण करावे लागेल, अशी अट घालण्यात आली होती. या अंतर्गत जनसंघ जनता पक्षात विलीन झाला. जनता पक्षाच्या सरकारमध्ये जनसंघाच्या बाजूने अडवाणी माहिती आणि प्रसारण मंत्री झाले. अटलबिहारी वाजपेयी यांना परराष्ट्र मंत्री करण्यात आले. पण, काही काळानंतर परस्परांच्या भांडणामुळे १९७९ मध्ये मोरारजी देसाईंचे सरकार पडले. या स्थितीत जनता पक्षातील संघी नेत्यांना नवे व्यासपीठ निर्माण करण्याची गरज भासू लागली. अशा प्रकारे, 6 एप्रिल 1980 रोजी मुंबईत एका नवीन राजकीय पक्षाची करण्यात आली, ज्याचे नाव भारतीय जनता पार्टी होते.

एनडीएची स्थापना : दोन संयुक्त आघाडी सरकारे झाल्यानंतर मध्यावधी निवडणुकांसाठी एनडीएची स्थापना झाली. याबाबत शिवसेना, समता पक्ष, बिजू जनता दल, अकाली दल आणि अण्णाद्रमुक यांच्याशी करार झाला. भाजपाला 182 जागा मिळाल्या आणि वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. पण, 13 महिन्यांनंतर वाजपेयी सरकार पुन्हा पडले. यानंतर 1999 च्या निवडणुकीत भाजपाने पुन्हा बाजी मारली. एनडीएला 303 जागा मिळाल्या.

भाजपासमोर इंडिया आघाडीचे आव्हान : वाजपेयींच्या नेतृत्वाखाली ५ वर्षे सरकार चालवण्याची संधी पुढे मिळाली. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ 1२ जागा मिळाल्या होत्या. लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली 2009 मध्ये 116 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी 283 जागा जिंकून इतिहास रचला. भाजपाचे सरकार एकहाती सत्ता स्थापन झाली. यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने 300 हून अधिक जागा जिंकून इतिहास रचला. एनडीएने 350 हून अधिक जागा जिंकल्या. एकेकाळी केवळ दोन खासदार जिंकून आलेल्या भारतीय जनता पक्षाचे डोळे 400 पार करण्याकडे लागले आहेत. यावेळेस भारतीय जनता पक्ष म्हणजेच एनडीए समोर इंडिया आघाडीचे तगडे आव्हान आहे. मात्र काही झाले तरी या निवडणुकीत 400 पासून एनडीए आघाडीला कोणी रोखू शकणार नाही, असं उपाध्ये म्हणाले.

हेही वाचा :

  1. आमदार रवी राणांपेक्षा त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा दुप्पट श्रीमंत! - Navneet Rana Property
  2. स्वतःच्या ताटात वाढून घेणं ही शिवसेनेची पद्धत नाही, फडणवीसांना श्रीकांत शिंदेंची उमेदवारी घोषित केल्यावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024
  3. तर राज ठाकरेंसाठी आम्ही रेड कार्पेट टाकणार, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया - MNS Entry In Mahayuti

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.