ETV Bharat / state

'लालपरी'च्या अपघातात घट झाल्याचा दावा ; नाशिक विभागात एसटीच्या 120 अपघातात 22 ठार, तर 196 जण जखमी - REDUCE ST BUS ACCIDENT IN NASHIK

लालपरी अर्थात सर्वसामान्यांच्या एसटी बसच्या अपघातात घट झाल्याचा दावा नाशिकच्या अधिकाऱ्यांनी केला. मागील आठ महिन्यात नाशिकमध्ये 22 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 196 जण जखमी झाले.

Reduce ST Bus Accident In Nashik
संग्रहित छायाचित्र (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

नाशिक : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात एप्रिल ते नोव्हेंबर 2024 या आठ महिन्याच्या कालावधीत एसटी बसच्या अपघाताची चांगलीच मालिका घडली. या कालावधीत एसटी बसचे एकूण 120 अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला, तर 196 जण जखमी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाती मृत्यूचं प्रमाण 30 ते 35 टक्क्यांनी घसरली आहे, असं राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

Reduce ST Bus Accident In Nashik
संग्रहित छायाचित्र (Reporter)

आठ महिन्यात शंभरीपार बस अपघात : नाशिक विभागात आठ महिन्यात बस अपघात शंभरीपार गेले आहेत. तरी मागील वर्षीच्या तुलनेत गतवर्षी याच कालावधीत झालेल्या अपघाती मृत्यूचं प्रमाण 30 टक्क्यांनी कमी असल्याचा दावा एसटी महामंडळानं केला. एप्रिल ते नोव्हेंबर 2024 या आठ महिन्याच्या कालावधीत बसच्या एकूण 120 अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला, तर 196 जण जखमी झाले आहेत. कधी बस चालकाच्या दोषामुळे तर कधी तांत्रिक दोषामुळे, तर कधी अन्य वाहनधारकांच्या दोषामुळे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गतवर्षी एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत नाशिक विभागात 123 अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला, तर 230 जण जखमी झाले होते.

Reduce ST Bus Accident In Nashik
संग्रहित छायाचित्र (Reporter)

वाहन चालकावर काय केली जाते कारवाई : अपघाताच्या स्वरूपानुसार महामंडळाकडून चालकांवर नियमानुसार कारवाई केली जाते. किरकोळ अपघात असल्यास चालकाची एक किंवा दोन दिवस किंवा कोणी जखमी झाले असेल, तर काही काळ स्टेरिंग ड्युटी बंद ठेवली जाते. परंतु अपघातात कोणी जीव गमावला तर संबंधित चालकावर नियमानुसार निलंबनाची कारवाई केली जाते. निलंबित चालकाला पुन्हा कामावर रुजू करून घेताना त्याचं समुपदेशन करून पुन्हा प्रशिक्षण दिलं जाते, असं एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

अपघाताची कारणे :

  • बसचालकाच्या चुकीमुळे 46
  • दुचाकीस्वराच्या चुकीमुळे 10
  • अन्य वाहनचालकाच्या चुकीमुळे 34
  • अन्य कारणामुळे झालेले अपघात 28
  • पदचार्‍याच्या चुकीमुळे दोन
  • एकूण 120

हेही वाचा :

  1. दुचाकीला कट मारल्यानं मारहाण, तरुणाच्या आत्महत्येनंतर एसटी चालकाला अटक
  2. सासू सासऱ्यानंच केला जावयाचा 'गेम'; धावत्या एस टी बसमध्येच केला खून, मृतदेह सोडला बस स्थानक परिसरात - Man Murder In Running ST Bus
  3. आली रे आली 'लालपरी' आली! तब्बल 76 वर्षांनी कोल्हापुरातील मानेवाडीत आली एसटी बस, गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात केलं स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.