ETV Bharat / state

ओडिसाच्या महिलेचा गोणीत आढळला मृतदेह; पती फरार झाल्यानं चर्चेला उधाण - Odisha Woman Killed In Mumbai - ODISHA WOMAN KILLED IN MUMBAI

Odisha Woman Killed In Mumbai : ओडिसातून मजुरी करायला आलेल्या जोडप्यातील महिलेचा प्लास्टिकच्या गोणीत मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना गोरेगाव पूर्व इथं मंगळवारी उघडकीस आली. या महिलेचा पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Odisha Woman Killed In Mumbai
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 6:58 AM IST

मुंबई Odisha Woman Killed In Mumbai : ओडिसाच्या महिलेचा प्लास्टिकच्या गोणीत मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना गोरेगाव पूर्वमधील एका घरात मंगळवारी उघडकीस आली. पोलिसांनी प्रथमदर्शनी ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिव्या टोपो (वय 29) असं मृत महिलेचं नाव आहे. वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामपियारे राजभर यांनी सांगितलं की, "मंगळवारी सकाळी 11 वाजता या घटनेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे." या महिलेचा पती जयराम लाक्रा हा फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ओडिसाचं मजूर जोडपं रोहत होतं गोरेगावात : दिव्या ही तिचा पती जयराम लाक्रा (वय 30) याच्यासोबत गोरेगाव पूर्व येथील अशोक नगर भागात गेल्या दोन वर्षांपासून राहात होती. हे जोडपं मूळ ओरिसाचं रहिवासी असून दोघंही रोजंदारीवर काम करतात. घरमालकाचं राहत्या घराच्या खाली दुकान आहे. गेल्या काही दिवसांपासून या जोडप्याच्या घरातून उग्र वास येत होता. सुरुवातीला घरमालकानं प्राणी मेला असं समजून दुर्लक्ष केलं. मात्र दुर्गंधी वाढल्यानं त्यांनी मंगळवारी दाम्पत्याच्या घरी जाऊन तपासणी केली, तेव्हा या घटनेला वाचा फुटली.

दोरीनं गळा आवळून महिलेचा केला खून : जयराम आणि दिव्या राहत असलेल्या घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. यानंतर घरमालकानं वनराई पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे वनराई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर दाखल होत त्यांनी दरवाजा तोडला. यावेळी त्यांना घरात प्लास्टिकची पिशवी आढळून आली. पोलिसांनी ती गोणी उघडली असता, त्यात नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून दिव्याचा खून करण्यात आल्याचं उघड झालं. कुजलेल्या स्वरूपात दिव्याचा मृतदेह चादरीत गुंडाळलेला होता. घरात दिव्याचा मृतदेह आढळून आला, मात्र तिचा पती जयराम हा फरार आहे. त्याचा मोबाईल देखील बंद असल्याचं आढळून आलं. याप्रकरणी दिव्याचा पती जयराम लाक्रा हा संशयित असून त्याचा शोध वनराई पोलिसांकडून सुरू आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. दृश्यम स्टाईल खुनाचा थरार: प्रेम प्रकरणातून ज्योतिष्यानं तरुणाचा केला खून, मृतदेह पुरला कार्यालयाखाली - Astrologer Became Killer
  2. एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून : प्रेमाला नकार दिल्यानं नराधमानं घरात घुसून तरुणीला भोसकलं - Girl Stabbed To Death
  3. हुबळीत काँग्रेस नेत्याच्या मुलीची हत्या, 'लव्ह जिहाद'चा पालकांचा आरोप; 'अभाविप'कडून घटनेचा निषेध - Hubli Murder Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.