ETV Bharat / state

ओबीसी शिष्टमंडळ व सरकारसोबत झालेल्या बैठकीत भुजबळांची सटकली; सरकारकडे केली 'ही' मागणी - OBC Reservation - OBC RESERVATION

OBC Reservation : सह्याद्री अतिथीगृहात ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक पार पडली, सरकार ओबीसी आरक्षणाबाबत सकारात्मक असलं तरी अनेक बाबींचं स्पष्टीकरण झालेलं नसून मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सरकारनं पूर्णपणे स्पष्टता करावी अशी मागणी ओबीसी नेत्यांनी या बैठकीत केली.

Chhagan bhujbal
छगन भुजबळ (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 10:29 PM IST

मुंबई OBC Reservation : मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी नेत्यांनी आपली भूमिका मांडताना छगन भुजबळ, पंकजा मुंडे हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सरकार ओबीसी आरक्षणाबाबत सकारात्मक असलं तरी अनेक बाबींचं स्पष्टीकरण झालेलं नसून मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सरकारनं पूर्णपणे स्पष्टता करावी अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली.

सर्व दाखले आधारकार्डला जोडले जाणार : या बैठकीनंतर बोलताना मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबत झालेल्या चर्चेमध्ये असं ठरलं की खोटी प्रमाणपत्र0 कुणालाही देण्यात येणार नाही. कुणबी दाखल्याची खोटी नोंद असेल तर ती तपासली जाणार, खोटी प्रमाणपत्र घेणं व देणं हे दोन्ही गुन्हेगार असणार, सर्व मराठा समाजाची सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणार नाही, कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, अनेक जण विविध मार्गानं फायदे घ्यायला बघतात. म्हणून आता सर्व दाखले आधारकार्डला जोडण्याचं काम केलं जाणार आहे, याचा आम्ही स्वीकार करतो. यामुळं जी कोणी व्यक्ती असेल ती फक्त एकाच योजनेचा लाभ घेऊ शकेल. अशा रीतीनं आता सरकारला फसवलं जाणार नाही."

मराठा समाजावर अन्याय करणार नाही : मंत्रिमंडळात ज्या पद्धतीनं मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जशी समिती आहे. तशी ओबीसी, भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी समिती निर्माण करण्यात येईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं. त्याचसोबत सगेसोयरेच्या बाबतीत बराच मोठा उहापोह झाला. परंतु, आम्ही त्यांना सांगितलं, यात फार त्रुटी आहेत. एससी, एसटी, ओबीसी असेल त्यांना प्रमाणपत्र कसं द्यावं. जात पडताळणी कशी करावी या संदर्भामध्ये पूर्ण माहिती असलेलं एक मोठं पुस्तक आहे. त्याप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता करुन सर्टिफिकेट देण्यात येतात. मग जर का एक अशा पद्धतीचं डॉक्युमेंट असताना दुसरं करण्याची गरज नाही असं आम्ही त्यांना सांगितल्याचं छगन भुजबळ म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन : येणाऱ्या अधिवेशन काळात सर्व पक्षांची एक संयुक्त बैठक घेऊन सगेसोयरे बाबत काय करायचं आहे, याबाबत एक निर्णय घेतला जाईल. अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचंही भुजबळ म्हणाले. आम्ही मराठा समाजावर अन्याय करणार नाही त्याचबरोबर ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी आमची भूमिका असल्याचंही भुजबळ म्हणाले. उद्या मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ वडीगोद्रीला व पुणे या दोन्ही ठिकाणी उपोषणकर्त्यांना भेटून त्यांची समजूत काढणार आहे व त्यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती करणार आहे. त्याचबरोबर मी छगन भुजबळ आहे, ओबीसी समाजाचा मोठा नेता आहे. मी जेव्हा तिथं जाईल तेव्हा ते माझी मागणी मान्य करतील असा ठाम विश्वासही छगन भुजबळ यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. ओबीसींचं शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्र्यांची भेट; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले... - OBC Reservation
  2. ''...तोपर्यंत उपोषण कायम राहणार''; लक्ष्मण हाके यांची शिष्टमंडळाकडे 'ही' मागणी - OBC reservation

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.