ETV Bharat / state

अनंत-राधिकाच्या लग्नात आलेल्या वऱ्हाडींची नीता अंबानींनी मागितली माफी; 'हे' आहे कारण - Anant Radhika Wedding - ANANT RADHIKA WEDDING

Anant Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कनव्हेंशन सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला देशातील तसंच परदेशातील दिग्गजांनी हजेरी लावली.

Anant Radhika Wedding
अनंत अंबानी, राधिका मर्चंट, नीता अंबानी फोटो (Source : Social Media)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 10:37 PM IST

Updated : Jul 14, 2024, 10:52 PM IST

मुंबई Anant Radhika Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani Radhika Merchant Wedding) आणि राधिका मर्चंट यांचा विवाह पार पडला. 12 जुलैला या दोघांनी सात फेरे घेतते. त्यानंतर 13 जुलैला अंबानी कुटुंबीयांनी शुभ आशीर्वाद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तर 14 जुलै अर्थात रविवारी विवाह सोहळ्याचं रिसेप्शन कार्यक्रम होता. देश, विदेशातील दिग्गज या विवाह सोहळ्याला हजर होते. करोडो रुपये खर्च केलेल्या या 'श्रीमंत' विवाहाची जगभरात सध्या चर्चा सुरू आहे.

दिग्गजांनी दिले आशीर्वाद : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधली. शुक्रवारी, 12 जुलै 2024 रोजी दोघांनी सात फेरे घेतले. अनंत अंबानी यांच्या भव्य विवाह सोहळ्यात देश-विदेशातील पाहुणे सहभागी झाले होते, तर शुभ आशीर्वाद समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ज्येष्ठ नेते आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तींनी अनंत आणि राधिका मर्चंट यांना आशीर्वाद दिले.

नीता अंबानींनी मागितली माफी : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह समारंभाला आल्याबद्दल रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी सर्वांचे आभार मानले. "तुम्ही आमच्या सेलिब्रेशनचा एक भाग झालात, तुमच्या सहभागाबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते," असंही त्या म्हणाल्या. "तसंच हे विवाह घर असल्यानं आमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मी माफी मागते," असंही नीता अंबानी यावेळी म्हणाल्या.

पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह थाटामाटात लागला. या विवाह सोहळ्याला बॉलिवूड, हॉलिवूड सेलेब्रिटी सहभागी झाल्या. त्यांनी अनंत आणि राधिकाला आशिर्वाद दिले. अंबानी कुटुंबियांकडून या व्हीव्हीआयपी पाहुण्यांना खास रिटर्न गिफ्ट मिळाले. त्याची किंमत जवळपास 2 कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, व्हीव्हीआयपी पाहुण्यांना महागडे घड्याळं गिफ्ट देण्यात आली आहेत.

हेही वाचा -

  1. अनंत-राधिका यांचं हनिमून डेस्टिनेशन ठरलं! पण प्लॅन... - Anant Ambani and Radhika Merchant
  2. अनंत अंबानी राधिका मर्चंट यांना पंतप्रधान मोदींनी दिले आशीर्वाद; विवाह सोहळ्यातील धार्मिक कार्याला हजेरी - Pm Modi In Anant Radhika Wedding
  3. अनंत अंबानींकडून शाहरूखसह खास मित्रांना महागड्या घड्याळाची भेट, किंमत जाणून तुम्हाला बसेल धक्का - Anant Radhika Wedding

Last Updated : Jul 14, 2024, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.