नांदेड : शेतातून आणलेल्या सोयाबीनच्या शेंगा खाल्ल्यानं 9 जणांना विषबाधा झाल्याची घटना नांदेड शहरातील सिडको परिसरात घडली. यात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. विषबाधा झालेल्या 9 जणांना विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
12 वर्षीय मुलीचा मृत्यू : गुरुवारी रात्री सिडको भागात राहणाऱ्या खांनजोडे या कुटुंबातील 10 जणांनी बाभळगाव परिसरातील शेतातून आणलेल्या शेंगा उकडून खाल्ल्या. शेंगा खाल्ल्यानंतर या सर्वांना मळमळ आणि उल्टीचा त्रास सुरू झाला. यानंतर सर्वांना नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यातील 12 वर्षीय मुलगी मिरा नामदेव खानजोडे हिची प्रकृती बिघडत चालली होती. रविवारी (6 ऑक्टोबर) सकाळी विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
याआधी 700 जणांना विषबाधा : काही दिवसांपूर्वी नेरली येथे तब्बल 700 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता सिडको भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 9 जणांना विषबाधा झाल्याची दुसरी घटना समोर आली.
हेही वाचा
- "तुम्ही खुनी आहात, कुठल्या तोंडानं मतं मागणार?"; सुप्रिया सुळेंचा सुनील टिंगरेंवर निशाणा - Supriya Sule On Sunil Tingre
- चेंबूरमध्ये आगीची दुर्घटना, एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू - Mumbai fire news
- मुलं पळवणारी सांगलीची टोळी पालघरमध्ये जेरबंद; दोन पुरुषांसह चार महिलांना ठोकल्या बेड्या - Child Kidnapping Gang