छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : एनआयए आणि एटीएस यांच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात छापेमारी करत संशयित युवकांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी (4 ऑक्टोबर) रात्रीपासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यातून तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून काही महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर येथील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्यानं ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
तिघं ताब्यात : एनआयए आणि एटीएस यांच्या माध्यमातून राज्यभर धाडसत्र करण्यात आलं. यात तीन जिल्ह्यात एकाचवेळी करण्यात आली. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक मालेगाव या भागांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर येथील आझाद चौक आणि एन 6 या भागातून दोन जणांना तर जालना जिल्ह्यातील गांधीनगर या भागातून एकाला ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कारवाई झालेल्या ठिकाणी शनिवारी सकाळपर्यंत पंचनामे करण्याची कारवाई सुरू होती. तसंच सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडं असलेले दस्तऐवज, मोबाईल, लॅपटॉप यांची तपासणी केली जात आहे.
याधीही शहरात झाली होती कारवाई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या अगोदरही अनेकवेळा दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या युवकांना ताब्यात घेण्यात आलय. इतकंच नाही तर काही वर्षांपूर्वी हिमायत बाग येथे एटीएसनं दहशतवाद्याचं एन्काऊंटर देखील केलं होतं. या पार्श्वभूमीवर हे शहर संवेदनशील समजलं जातं. त्यामुळंच दहशतवाद्यांचे स्लीपर सेल या शहरात सुरू आहेत का? असा प्रश्न निर्माण होतोय.
हेही वाचा -
- मानवी तस्करी सायबर फ्रॉड प्रकरण : एनआयएची देशभरात छापेमारी, 5 आरोपींना ठोकल्या बेड्या - Human Trafficking And Cyber Fraud
- एनआयएमधील बड्या अधिकाऱ्याच्या मुलीचा विद्यापीठात घातपात? अधिकाऱ्याचे 'हे' आहे महाराष्ट्र कनेक्शन - NIA IG daughter death
- बंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरण : एनआयएकडून छत्रपती संभाजीनगरातील तीन तरुणांची चौकशी - Bengaluru Cafe Bomb Blast Case