ETV Bharat / state

NEET पेपर लीक प्रकरण : आरोपी जलील पठाणचा उदगीरात एक कोटीचा बंगला; दिव्यांग प्रमाणपत्रही बोगस? - NEET Paper Leak Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 12:43 PM IST

Updated : Jun 27, 2024, 2:38 PM IST

NEET Paper Leak Case : लातूर NEET पेपर लीक प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकानं जलील पठाण याला अटक केली आहे. जलील पठाण याचा लातुरात एक कोटी रुपयाचा बंगला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

NEET Paper Leak Case
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

NEET पेपर लीक प्रकरण : आरोपी जलील पठाणचा उदगीरात एक कोटीचा बंगला (Reporter)

लातूर NEET Paper Leak Case : 'नीट' परीक्षा घोटाळा प्रकरणी अटकेतील आरोपी जलील पठाण यानं लातूरच्या उदगीर शहरातील जळकोट रोड परिसरात एक कोटी रुपयांचा बंगला सहा महिन्यापूर्वीच बांधला आहे. तर शासकीय नोकरीत बढतीसाठी त्यानं जोडलेलं कर्णबधीर असल्याचं दिव्यांग प्रमाणपत्रही आता संशयाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. याची गंभीर दखल घेत या प्रमाणपत्राच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

जलील पठाण जिल्हा परिषदेकडून निलंबित : 'नीट' पेपर फुटीच्या प्रकरणात एटीएसनं अटक केलेला लातूरच्या कातपूर जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक जलील पठाण हा 2009 मध्ये जिल्हा परिषद शिक्षक म्हणून शासकीय सेवेत भरती झाला. काही वर्षानंतर त्यानं लातूर जिल्ह्यात बदली करून घेतली. प्रथमतः अहमदपूर आणि नंतर लातूर तालुक्यातील कातपूर इथं मुख्याध्यापक म्हणून रुजू होता. नांदेडच्या एटीएसनं त्याला अटक करताच लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी त्याला निलंबित केलं. त्याचा पदभार काढून घेण्यात आला. निलंबन काळात त्याला निलंगा पंचायत समितीमध्ये हजेरी देण्यास सांगितलं आहे.

कर्णबधीर प्रमाणपत्र बोगस असल्याची शक्यता : आरोपी पठाण यानं शासकीय नोकरीत भरतीसाठी कर्णबधीर असल्याचं पुणे जिल्हा शल्यचिकित्सकांची स्वाक्षरी असलेलं प्रमाणपत्र जोडलं आहे. हे प्रमाणपत्र बोगस असल्याचा संशय अधिकाऱ्यांना असून ते प्रमाणपत्र पुणे येथील विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आलं आहे. त्याचा अहवाल दोन दिवसात येणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे.

पठाणचा एक कोटीचा बंगला : उदगीर शहरातील जळकोट रोडवर आरोपी जलील पठाण याच्या मालकीच्या जागेतील तीन मजली इमारत सहा महिन्यापूर्वीच बांधून पूर्ण झाली. दुसरा मजला रिकामा असून तिसऱ्या मजल्यावर दोन भाडेकरु राहतात. आरोपी जलील पठाण हा मूळचा देवणी तालुक्यातील विजयनगर येथील रहिवासी असून गावी त्याची शेती आहे. त्याचे वडील उमरखान पठाण यांनी गावातच चार म्हशी पाळल्या असून ते दुग्ध व्यवसाय करतात. तर जलीलचे चार भाऊ गावातच राहतात.

गुन्हा दाखल झाल्यापासून पठाण फरार : लातूर शहरातील एसटी वर्कशॉप समोरील कॉलनीत आरोपी जलील पठाण एका अपार्टमेंटमध्ये मुलाबाळांसह राहतो. परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून जलीलची पत्नी मुलं गायब आहेत. जलील पठाणची दोन्ही मुलं वार्षिक 90 हजार रुपये शुल्क असलेल्या महागड्या शाळेत शिक्षण घेत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हेही वाचा :

  1. नीट घोटाळ्यानं जिल्हा परिषद शाळेची प्रतिमा डागाळली, आरोपी मुख्याध्यापकाचं निलंबन, विभागीय चौकशीसाठी प्रस्ताव - NEET Paper Leak Scame
  2. नीट घोटाळ्यात बीड कनेक्शन: बीड, माजलगावमधील दोघांची संशयितामध्ये नावं, शिक्षण क्षेत्राला हादरा - NEET Paper Leak Beed Connection
  3. 'नीट'घोटाळा प्रकरण; लातूर पोलीस धडकले उत्तराखंडमध्ये, कोनगुलवार कुटुंबीयांसह फरार - NEET Paper Leak Case

Last Updated : Jun 27, 2024, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.