ETV Bharat / state

केंद्रिय मंत्रिमंडळात 'शिवसेने'ला दोन, तर 'राष्ट्रवादी'ला एक मंत्रिपद; खासदारांच्या संख्येनुसार मंत्रिपद मिळणार? - NDA government - NDA GOVERNMENT

NDA Government : 18 व्या लोकसभेसाठी पुन्हा एकदा देशात एनडीएचं सरकार स्थापन होत आहे. एनडीए सरकारमध्ये राज्यातील मित्र पक्षांना यथोचित जागा मिळतील, असं मित्र पक्षांकडून सांगण्यात येतय. शिवसेनेला दोन मंत्रिपदं तसंच राष्ट्रवादी काँग्रेसला एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

NDA government
एकनाथ शिंदे, अजित पवार, नरेंद्र मोदी (ETV BHARAT Maharashtra Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 5:55 PM IST

मुंबई NDA Government : केंद्रात सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरला असून येत्या आठ तारखेला नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे. पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची वर्णी लागणार असून नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असणार याबाबत आता तर्क वितर्क लढवले जात आहेत. केंद्रात भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं नसल्यानं आता मित्र पक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. एनडीए मित्र पक्षांमध्ये महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांचा प्रमुख समावेश आहे. यापैकी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्यक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरून निवडणूक लढवली आहे. तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटानं एकही जागा न लढवता एनडीएला पाठिंबा दिला होता.

अरुण सावंत यांची प्रतिक्रिया (Reporter ETV BHARAT Maharashtra Desk)

शिवसेनेला दोन मंत्रिपदे : राज्यात शिवसेनेनं सात जागा जिंकल्या आहेत. मंत्रिपदाच्या लालसेनं 'एनडीए'ला पाठिंबा दिलेला नाही. देशाचा विकास व्हावा म्हणून आपण त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, आता पक्षाकडून आपला यथोचित सन्मान होईल, असं शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी सांगितलं. सात जागांवर आम्हाला राज्यात विजय प्राप्त करता आला. त्यामुळं किमान दोन मंत्रिपदं आमच्या वाट्याला येतील, अशी आमची अपेक्षा आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असं शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसला एक मंत्रीपद : राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यात चार जागांवर निवडणूक लढवली होती. या चार जागांपैकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसाचा विजय झाला आहे. त्यामुळं मंत्रिपदासाठी आम्ही थेट दावा केलेला नाही. मात्र ज्या पद्धतीनं काल एनडीएच्या बैठकीत चर्चा झाली, त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला एक मंत्रिपद येणार आहे. या मंत्रिपदावर आमचे राष्ट्रीय नेते प्रफुल पटेल यांची वर्णी लागण्याची शक्यता, असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुनिल तटकरे यांनी सांगितलं.

परंपरेनुसार शिवसेनेकडं अवजड उद्योग : 1995 पासून शिवसेना-भाजपा यांची युती होती. मधल्या काळात युती तुटली. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत पुन्हा भाजपाशी युती केली. त्यामुळं केंद्रात शिवसेना पक्षाला नेहमी अवजड उद्योग खातं देण्यात येत होतं. त्यामुळं यावेळी मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असं सावंत यांनी म्हटलय.

शिंदे गटाकडून कोणाची लागणार वर्णी : शिवसेना शिंदे गटाकडून मंत्रिपदासाठी सात जणांपैकी मराठवाड्यासह मुंबईतील खासदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. बुलढाणा येथील शिवसेना खासदार प्रतापराव जाधव चौथ्यांदा विजयी झाले आहेत. त्यामुळं मंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे. मराठवाड्यातील वर्चस्व राखण्यासाठी संदिपान भुमरे यांच्या नावाची सुद्धा चर्चा केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईला प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीनं रवींद्र वायकर यांना राज्यमंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते.

रिपाईंला हवं कॅबिनेट मंत्रीपद : लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा रिपाईंला मिळावा, अशी आग्रही मागणी रामदास आठवले यांनी केली होती. मात्र, हा मतदारसंघ न देता तुम्हाला केंद्रात बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लावू, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्यानुसार आता आपल्याला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदी बढती हवी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

'हे' वाचलंत का :

  1. महाराष्ट्राच्या 13 आमदारांनी आजमावलं लोकसभेत नशीब; तब्बल सात आमदारांना लागली खासदाराची लॉटरी - MLA Won In Lok Sabha Election Result 2024
  2. झोपड्यांवर महापालिकेची करवाई: पवईत पोलिसांवर जमावाची दगडफेक, 5 पोलीस जखमी - Stone Pelting On Mumbai Police
  3. विकासाचे महामेरू नितीन गडकरी; महामार्ग, उड्डाणपूल, खडेबोल: काय आहे नागपूरचा गड राखणाऱ्या गडकरींच्या विजयाचं गमक - Nagpur Lok Sabha Result 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.