ETV Bharat / state

भाजपात प्रवेश करणार का ? खासदार नवनीत राणांनी स्पष्टचं सांगितलं; 'उद्या जेपी नड्डांच्या उपस्थितीत करणार शक्ती प्रदर्शन' - जे पी नड्डा घेणार एनडीएची बैठक

Navneet Rana Will join BJP ?: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थित सोमवारी एनडीएची अमरावतीत बैठक होणार आहे. त्यामुळं खासदार नवनीत राणा यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा मोठा प्रमाणात होत आहेत. त्यावर खासदार नवनीत राणा यांनी भाष्य केलं आहे.

Navneet Rana Will join BJP
खासदार नवनीत राणा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 11:45 AM IST

Updated : Mar 3, 2024, 12:23 PM IST

खासदार नवनीत राणा

अमरावती Navneet Rana Will join BJP ? : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा सोमवारी नागपूरला राष्ट्रीय लोकतांत्रिक गटबंधनमध्ये असणाऱ्या घटक पक्षांची बैठक घेणार आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आपल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांच्यासमोर शक्ती प्रदर्शन करणार आहेत. "खासदार म्हणून मी मतदार संघात विकासात्मक कामं कशी केली, यासंदर्भात आपल्या मतदार संघातील अनेक तरुण भाजपा अध्यक्षांना माहिती देणार आहेत, अशी माहिती खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

मंचावर राहणार उपस्थित : "राष्ट्रीय लोकतांत्रिक बंधनच्या सभेला भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह मी स्वतः देखील मंचावर उपस्थित राहणार," असं खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

भाजपा प्रवेशाच्या चर्चांना अर्थ नाही : "मला भाजपामध्ये जेव्हा केव्हा प्रवेश करावासा वाटेल, त्यावेळी मी जगजाहीर करून भाजपात प्रवेश करेल. मात्र आमचा स्वतःचा युवा स्वाभिमान पक्ष आहे आणि आम्ही भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएचे घटक आहोत. यामुळं मी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या केवळ अफवा पसरविल्या जात आहेत. आमच्या शेकडो कार्यकर्त्यांसह उद्या भाजपा अध्यक्षांसमोर जे काही शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे, त्यामागं अमरावतीच्या खासदार कशा सशक्त आहेत, हेच भाजपा श्रेष्ठींसमोर दाखवायचं आहे," असं देखील खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

अभिजीत अडसूळ यांनी केली होती टीका : दरम्यान माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी "सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होताच, नवनीत राणा या निवडणुकीत दिसणार नाहीत, असं शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं. भाजपाच्या स्थानिक नेत्यांसह शिवसैनिक आणि बच्चू कडूंची देखील राणांवर नाराजी आहे," अशी टीका आमदार अभिजीत अडसूळ यांनी केली होती.

आयोध्या स्पेशल रेल्वे गाडीला दाखवला भगवा झेंडा : अमरावती रेल्वे स्थानकावरून रविवारी सकाळी आठ वाजता रामभक्तांना घेऊन स्पेशल अयोध्येसाठी रेल्वे गाडी सुटली. या गाडीला आज खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी भगवा झेंडा दाखवला. राम भक्तांसह राणा समर्थकांनी यावेळी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या.

हेही वाचा :

  1. नवनीत राणांच्या अडचणी वाढल्या : जात प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाचं प्रतिकूल निरीक्षण
  2. 'सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवणीत राणा लोकसभा निवडणुकीत दिसणार नाहीत'

Last Updated : Mar 3, 2024, 12:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.