नवी मुंबई Uran Girl Murder Case : उरण इथल्या तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी तरुणीचा खून केल्यानंतर फरार झाला होता. त्यानंतर राज्यभर या तरुणीच्या खुनावरुन मोठा गदारोळ सुरू होता. या तरुणीचा मृतदेह उरण इथल्या परिसरात आढळल्यानंतर मोठा संताप व्यक्त करण्यात येत होता. उरण हत्याकाडांमुळे दोन समुदायात तणाव वाढला. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी जंगजंग पछाडत दाऊद शेख याला गुलबर्गा शहराजवळील शाहापूर इथून बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Yashshri Shinde murder case | Navi Mumbai apprehended accused Dawood from Karnataka. He has been taken in custody from Shahpur, district Gulbarga, Karnataka: Navi Mumbai Police #Maharashtra
— ANI (@ANI) July 30, 2024
कर्नाटकातील शाहपूर हिल्समध्ये पकडला दाऊद : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं की, "फरार दाऊद शेख कलबुर्गी जिल्ह्यातील शाहपूर हिल्समध्ये आढळून आला आहे. त्याला 27 जुलैला तरुणीच्या निर्घृण हत्येचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर नवी मुंबई पोलीस दाऊद शेखचा शोध घेत होते. उरण रेल्वे स्थानकाजवळील झुडपात तरुणीचा मृतदेह आढळून आला." उबाठा गटाचे नेते तथा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, "शिवसेना पीडित कुटुंबाच्या सोबत आहोत. आम्ही सरकारला आरोपीचा शोध घेऊन कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहोत."
उरण रेल्वे स्थानकाजवळ आढळला मृतदेह : पीडित तरुणी 25 जुलैला सायंकाळी मित्राला भेटण्यासाठी बेलापूर इथल्या घरातून निघाली. मात्र ती दुसऱ्या दिवशीही परत न आल्यानं तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दोन दिवसांनी पीडितेचा मृतदेह उरण स्थानकाजवळ आढळून आला. पीडितेच्या शरीरावर अनेक चाकूनं मारल्याच्या जखमा आढळून आल्या. तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी दाऊद शेखवर आरोप केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊदवर पूर्वी तरुणीनं दाखल केलेल्या विनयभंगाची 2019 ची तक्रार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्याचा समावेश आहे. दाऊद हा जामिनावर बाहेर असून कर्नाटकात पळून गेला होता. त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे.
हेही वाचा :