ETV Bharat / state

पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून मित्राची हत्या, अवघ्या तीन तासांत उरण पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या - Navi Mumbai crime

Jasai village murder case : उरण तालुक्यातील जासई गावात पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधातून मित्राचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी उरण पोलिसांनी अवघ्या तीनच तासात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Dead body found in sack
गोणीत आढळला मृतहेद (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 6:18 PM IST

नवी मुंबई Jasai village murder case : उरण तालुक्यातील जासई गावात एक थरारक घटना घडली होती. शनिवारी गावातील दि.बा. पाटील सभागृहाजवळ असणाऱ्या निर्जन ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्यानं मित्राची हत्या केल्याची कबुली पतीनं दिली आहे.

अनैतिक संबंधातून मित्राची हत्या (ETV BHARAT Reporter)

अनैतिक संबंधातून हत्या : आरोपी आणि मृत दोघेही सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील रहिवाशी आहेत. दोघंही एकाच ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करत होते. त्यामुळं दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. हे दोघेही उरण तालुक्यातील जासई गावात भाड्यानं राहत होते. त्यामुळं त्यांचं एकमेकांच्या घरीही येणं-जाणं होतं. यादरम्यान एका मित्रानं दुसऱ्या मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवले. याबाबत आरोपीनं मित्राला अनेकदा समज दिली होती. मात्र, आरोपीनं सांगूनही त्यानं पत्नीसोबत अनैतिक संबंध सुरुच ठेवले. त्यामुळं आरोपीनं मित्राचा कायमचा काटा ठरवलं. शुक्रवारी रात्री आरोपीनं जेवणाच्या बहाण्यानं त्याला घरी बोलावलं होतं. त्यानंतर आरोपीनं मित्राला दारू पाजली. मित्र दारूच्या नशेत झोपी गेल्यानं आरोपीनं त्याच्या डोक्यात दगडानं वार करून त्याचा खून केला. त्याचवेळी आरोपीनं पत्नीच्या डोक्यावरही वार करून तिलाही जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यानं पत्नीवर दबाव टाकून मृतदेह एका पांढऱ्या प्लास्टिकच्या गोणीत भरला. त्यानंतर मृतदेह पत्नीच्या मदतीनं जासई गावात दि.बा पाटील सभागृहजवळ फेकला. त्यानंतर आरोपींनी पलायनं केलं.

आरोपीला पनवेल परिसरातून अटक : या प्रकरणी उरण पोलिसांनी अवघ्या 3 तासात आरोपीला पनवेल परिसरातून अटक केलीय. आरोपीनं मित्राच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. तसंच त्यांनी मृतदेह गोणीत बांधून निर्जन ठिकाणी फेकून दिल्याचं पोलिसांना सांगितलंय. हा गुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, जितेंद्र मिसाळ, सहायक पोलीस निरीक्षक हुलगे, पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड आणि गुन्हे अन्वेषण पथकानं उघडकीस आणला.

काय आहे प्रकरण : उरण तालुक्यातील जासई गावात एक धक्कादायक घटना घडली होती. गावातील दि.बा. पाटील सभागृहाजवळ निर्जन ठिकाणी प्लास्टिकच्या गोणीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या गोणीतून दुर्गंधी येत असल्यानं या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोणीची तपासणी केली असता त्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.