ETV Bharat / state

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा; महानगरपालिकेला हवे 15 हजार कोटी रुपये... - Nashik Simhastha Kumbh Mela - NASHIK SIMHASTHA KUMBH MELA

Nashik Simhastha Kumbh Mela : 2026-27 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Simhastha Kumbh Mela) नाशिक महापालिकेनं भूसंपादनाच्या खर्चासह जवळपास 15 हजार कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करून, दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.

Nashik Simhastha Kumbh Mela
सिंहस्थ कुंभमेळा (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 7:49 PM IST

नाशिक Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिकमध्ये दर बारा वर्षानी 'सिंहस्थ कुंभमेळा' (Simhastha Kumbh Mela) होत असतो. यंदा 2026-27 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे. कुंभमेळ्यासाठी महानगरपालिकेनं यापूर्वी 11 हजार 600 कोटींचा आराखडा तयार करून शासनाकडं पाठवला होता. मात्र, त्यानंतर आता सुधारित आराखडा तयार करण्यात येणार आहे. जो 15 हजार कोटींचा असणार आहे. हा आराखडा दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.

15 हजार कोटीचा सिंहस्थ आराखडा : नाशिकमध्ये साधूग्रामसाठी घेण्यात येणाऱ्या सुमारे 300 एकर जमिनीच्या भूसंपादनासाठी साडेचार हजार कोटींचा जवळपास निधी लागणार आहे. तसंच रिंगरोडसह इतर ठिकाणी होणाऱ्या कामांची वाढ झाल्यामुळं आता नव्यानं सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा सिंहस्थ आराखडा महानगरपालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका आयुक्त आणि सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक झाली. आगामी कुंभमेळाबाबत केवळ कागदावरच नियोजन नको तर वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिला होत्या. त्यानंतर महानगरपालिका आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांनी तपोवन परिसरासह प्रत्यक्ष भेटीचा धडाका लावला आहे. त्यात शाही मिरवणूक मार्गाची पाहणी केली जात आहे.

अध्यक्षपदी गिरीश महाजन : कुंभमेळा अवघ्या तीन वर्षांवर येऊन ठेपला असून तयारी मात्र, कागदावरच दिसून येत आहे. लोकसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य शासनाच्या आदेशानुसार नाशिक महानगरपालिकेनं सिंहस्थसाठी 11 हजार 600 कोटी रुपयांच्या विकास कामाचा प्राथमिक प्रारूप आराखडा तयार केला होता. त्यात एकट्या बांधकाम विभागाच्या सहा हजार कोटींच्या कामांचा समावेश होता. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू असल्यामुळं सिंहस्थ कुंभमेळ्याचं काम रखडलं होतं. लोकसभेचं मतदान होताच जिल्हाधिकारी शर्मा यांनी महानगरपालिका प्रशासनाला सिंहस्थ आराखड्याची बैठक बोलवण्याचे आदेश दिले होते. यंदा नाशिकच्या कुंभमेळा जबाबदारी गिरीश महाजनांवर देण्यात आली आहे. आगामी कुंभमेळ्याच्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना सहअध्यक्षपद देण्यात आलं आहे.

या कामांचा आराखड्यात समावेश : कुंभमेळ्यात सर्वात महत्त्वाची जबाबदारी नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाची आहे. त्यानुसार सलग दोन दिवस बांधकाम विभागानं तयार केलेल्या आराखड्याची माहिती घेतली. परंतु, अनेक कामे आणि त्यासाठी लागणारे ढोबळ खर्च यांचा आराखड्यात अंदाज धरण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने नवीन रस्ते, नवीन रिंग रोड, मिसिंग लिंक, भूसंपादन, जुन्या रिंग रोडची पार्किंग व्यवस्था, नवीन पूल, शाही मार्ग भूसंपादन, न्यायप्रविष्ट प्रकरणे या कामांचा आराखड्यात समावेश आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्‍वर मार्ग होणार सहापदरी : नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा चौपदरी मार्ग सहापदरी करण्यात येणार असून त्यासाठीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं तयार केलाय. नव्याने दोन लेनमध्ये पालखी मार्गाचा विचार करून मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 240 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आराखड्यात नमूद करण्यात आलंय.

ही कामे प्रामुख्याने होणार : साधुग्रामसाठी 500 एकर भूसंपादनाचा प्रस्ताव, नाशिकमध्ये 160 किलोमीटरचे रिंगरोड प्रस्तावित, नाशिक शहरात नवीन 21 पूल उभारण्यात येणार, विल्होळी-सारुळ-त्र्यंबकरोड रिंगरोडचा प्रस्ताव, सिंहस्थात शहरात मुख्य, मध्य व बाह्य वाहनतळ, गणेशवाडी अग्निशमन केंद्र प्रस्तावित, शहरातील घाट, दिशादर्शकांची फेरबांधणीची गरज, इत्यादी कामे होणार आहेत.

हेही वाचा -

  1. Nashik Kumbh Mela Preparations : नाशिकमध्ये सिंहस्थपूर्व तयारीला सुरुवात, कुंभमेळ्याचा प्रारूप आराखडा 8 वरून 11 हजार कोटींवर
  2. Kumbhmela 2025 : कुंभमेळा 2025 च्या तारखा जाहीर, 'या' दिवशी होणार सुरुवात
  3. Nashik Ramkunda: रामकुंडात अस्थींचा खच; कुंडातील काँक्रिटीकरणामुळे प्रकार घडत असल्याचा गोदावरीप्रेमींचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.