ETV Bharat / state

ताशा कडाडला, ढोलही घुमला! 'नाशिक ढोल' पथकांचा आवाज देशात घुमणार; परराज्यातही क्रेझ, जाणून घ्या इतिहास - Nashik Dhol - NASHIK DHOL

Nashik Dhol : गणेशोत्सव आणि 'नाशिक ढोल' हे समीकरण देशभरात रूढ झालं. वेगळ्या पद्धतीनं तयार केलेल्या ढोलमुळं निर्माण होणारा ताल आणि ठेका हे नाशिकच्या ढोलचं खास वैशिष्ट्य. अनेक गणेश मंडळांचं आकर्षण ठरलेल्या या ढोल पथकाला यंदा राज्याबाहेरूनही मोठी मागणी आहे.

Nashik Dhol
नाशिक ढोल (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2024, 7:38 PM IST

नाशिक Nashik Dhol : लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी नाशिकची ढोल पथकं सज्ज झालीत. नाशिक, मुंबई, दिल्ली, सुरत, उज्जेन, हैदराबादसह राज्यातील विविध शहरांमध्ये नाशिकची ढोल पथकं आपली कला सादर करणार आहेत. या ढोल पथकात युवक, युवतींसह, चिमुकले कलाकारही सहभागी होणार आहेत. पारंपरिक वाद्यांचा समावेश असलेल्या या ढोल पथकाच्या वादनामुळं गणेशोत्सवाला वेगळेच वलय प्राप्त झालंय. नाशिक शहरात गणेशोत्सवासाठी 50 हून अधिक ढोल पथकं सज्ज झाली असून, गणपती आगमन सोहळा व विसर्जन मिरवणुकीत ही ढोल पथकं वादन करणार आहेत.

'नाशिक ढोल (Source - ETV Bharat Reporter)

'या' ढोल तालांची मोहीम : नाशिक शहरातील ढोल पथकांच्या 30 बीट, 8 बीट, नाशिक ढोल, शिवस्तुती, रामलखन, कृष्णा, ट्रेन, गोविंदा ढोलीबाजा, संबळ, वक्रतुंड, भीमरूपी, लायकारी गरबा या तालांनी वाद्यप्रेमी मंत्रमुग्ध होणार आहेत. या ढोल पथकात ढोल, ताशा, तोल, झांज आणि हिंदू धर्माची शान वाढवणारा भगवा ध्वज नाचवला जातो.

नाशिकचं प्रसिद्ध 'शिवराय वाद्य' पथक : 'शिवराय वाद्य' पथकाचा इतिहास पाहिला तर या पथकानं केवळ महाराष्ट्राचं नाही, तर दिल्लीतील संसद भवनही गाजवलं. त्याशिवाय हरिद्वार येथील कुंभमेळामध्ये वादनरुपी सेवा, तसेच मुंबईच्या चिंतामणी गणेश मंडळात ढोल वादन करण्याचा मानही 'शिवराय वाद्य' पथकानं पटकावला. नाशिकमधील मानाचा चौथा गणपती भगवान श्री साक्षी गणेशाच्या चरणी दरवर्षी विसर्जन मिरवणूक काढण्याचा मान या पथकाला आहे.

मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न : "'शिवराय वद्य' पथकाचं एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे आपली मराठी संस्कृती जपणं. संस्कृती जपण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडता हिंदू धर्माची शान अजून उंचावर घेऊन जाणं, हाच प्रयत्न 'शिवराय वाद्य' पथक करत असतो," असं शिवराय वाद्य पथक प्रमुख तुषार भागवत यांनी सांगितलं.

दोन महिन्यापासून सराव : "'शिवराय वाद्य' पथकाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पथकातील वादकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आमच्या पथकात शंभर मुलींचा समावेश असून तीनशे वादक आहेत. ढोल पथकात दिवसेंदिवस मुलींची संख्याही वाढत आहे. आम्ही गेल्या दोन महिन्यांपासून ढोल वादनाचा सराव करतोय. आमच्या पथकात महाविद्यालयीन युवक, युवती, आर्किटेक, डॉक्टर, अभियंता यांचा समावेश आहे. प्रत्येकजण आपली दैनंदिन जबाबदारी सांभाळून रोज दोन तास सराव करण्यासाठी येतात," असं पथकातील सदस्य साक्षी वाखारे यांनी सांगितलं.

नाशिक ढोलचा इतिहास : पर्यटन, गड किल्ल्यांपासून ते आयटी हबपर्यंत, द्राक्ष नागरी ते वाइन कॅपिटलपर्यंत नाशिक आज जगभरात नावलौकिक मिळवत आहे. नाशिकचं आणखी एक महत्त्वाचं बलस्थान म्हणजे नाशिक ढोल. नाशिक ढोलची वेगळी ओळख आहे. प्राचीन काळाशी निगडीत असलेल्या ढोल-ताशा, शंख-करंजी आणि ध्वजाशी घट्ट नातं असलेल्या आपल्या ढोल-ताशा पथकांनी आपल्या वादनानं सांस्कृतिक ओळख निर्माण केली. श्रीगणेश विसर्जन मिरवणूक आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला अशा पथकांचं लयबद्ध-तालबद्ध वादन ऐकणं म्हणजे एक पर्वणीच असते. नाशिक जिल्ह्यात आज 150 हून अधिक ढोल पथकं आहेत. काही पथकांमध्ये 3 वर्षांच्या वादकांपासून ते 60 वर्षांच्या व्यक्तीपर्यंत वादक आहेत. सण उत्सवाच्या काळात नाशिकच्या ढोल पथकांना देशभरातून मागणी असते.

हेही वाचा

  1. चित्रपटगृहात 'शोले' पुन्हा हाऊसफुल्ल, जावेद अख्तर यांनी सांगितल्या अविस्मरणीय आठवणी - Sholay special screening
  2. मेळघाटात रानभाजी महोत्सव : शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी मारला 'आरा' भाज्यांवर ताव - Ranbhaji festival in Melghat
  3. यंदा गणेशोत्सवात 'पीओपी'च्या गणेश मूर्तींवर बंदी नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा मूर्तीकारांना दिलासा - POP Ganesh Murti Banned

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.