नांदेड Nana Patole News: ''बेईमान गद्दार सरकारमुळं राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. या सरकारनं सर्वसामान्य जनतेचं जगण मुश्किल केलं आहे. यामुळं एखाद्या पक्षाच्या नेत्यांवर हल्ला केला जातो. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री राहतात, त्या ठिकाणी एखाद्या नेत्यावर हल्ला होणं अशोभनीय आहे. त्याचं कुणीही समर्थन करु शकत नाही'', असं व्यक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेत मनसैनिकांनी राडा केला. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. ते नांदेड येथे माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मराठ्यांना कमी फायदा झालाय. मनोज जरांगे हे आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना?" असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर नाना पटोले यांना विचारलं असता ते म्हणाले, 'कुणाबद्दल प्रतिक्रिया देण्यावर आम्हाला काही सीमा आहेत. कुणी काहीही बोलेल त्यावर प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही. सत्तेत बसलेल्या लोकांनी अनेक पोपट पोसून ठेवले आहेत. त्यांच्यावर आपण वक्तव्य करण्याचं काही कारण नाही'
हे सरकार मतिमंद आहे : "राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही. नापिकीच्या समस्या मोठ्या आहेत. अशातच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं फार नुकसान झालं आहे. तरुणांचे आणि बेरोजगारीचे प्रश्न आहेत. शिक्षक भरती होत नाही. आमच्या दबावामुळे सरकारनं काही शिक्षकांना नोकऱ्या दिल्या आहेत. परंतु त्यांना सरकार 16 हजार रुपये देत आहे. किमात वेतन देण्याची बुद्धीदेखील या सरकामध्ये नाही. हे सरकार गतिमंद आहे", अशी खोचक टीका नाना पटोलेंनी केली.
आगामी निवडणूकीत आम्ही 180 जागा जिंकू : राज ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्लाबद्दल विचारलं असता बाळासाहेब थोरात म्हणाले," महाविकास आघाडीतील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना टार्गेट करणं योग्य नाही. राज्यात महायुतीचे हाल होत आहेत. त्यामुळे ते मार्ग शोधण्यासाठी असा प्रयत्न करत आहेत. अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस पक्ष सोडून जाण्यावर विचारलं असता ते म्हणाले की, "अशोकरावांच काँग्रेस सोडून जाणं जनतेला आवडलं नाही. महाविकास आघाडीला विधानसभा निवडणूकीमध्ये चांगल यश मिळेल. जवळपास 180 जागेपर्यंत आम्ही पोहचू," असं मत बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केलं.
हेही वाचा