मुंबई Nana Patole On Modi : यवतमाळ जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पूर्णपणे राजकीय आहे. सभेचा खर्च पक्षाच्यावतीन केल जाणं अपेक्षित होतं, मात्र हा खर्च शासकीय तिजोरीतून केला जात आहे. तसंच सभेतील मांडवासाठी बाराशे कोटी, हेलिपॅडसाठी साडेतीन कोटी खर्च केला जातोय. त्यामुळं जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
जनतेच्या पैशाची उधळपट्टी : मराठवाडा, विदर्भ भागात मोठ्या प्रमाणात लोकांना सभेसाठी गोळा करायचा प्रयत्न केला गेला. त्यातल्या त्यात महिलांना भाजपानं गोळा केलं. यावेळी महिलांना गोळा करतानाचा एका व्हिडिओ नाना पाटोले यांनी पत्रकार परिषदेत दाखवला. "लोकप्रियता वाढवण्यासाठी अशा प्रकारची गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोर्चे काढणाऱ्या आंदोलक जरांगे यांच्याविरोधात एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तर, दुसरीकडं किती गाड्यात किती लोकांना बसवलं पाहिजे यासाठीदेखील कायदा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासाठी माणसं जमाण्याचं काम भाजपानं केलंय. त्यामुळं भाजपा सरकार जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत जनतेलाच त्रास देत आहेत," अशी टीका नाना पटोले यांनी केली.
काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल : "नांदेड जिल्ह्यातील तीनही आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेससोबतच आहेत. काही जण भीतीपोटी काँग्रेस पक्ष सोडून गेले. मात्र, पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसबरोबरच आहेत. काँग्रेस पक्षाला बळकट करण्याचं काम अधिक जोमानं सुरू असल्याचं ते म्हणाले. "नांदेडमधील तीनही आमदार माधवराव पाटील, मोहनराव हंबर्डे आणि जितेश अंतापुरकर काॅंग्रेससोबतच आहे. तसंच नांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यानं आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल," असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.
हे वाचलंत का :