ETV Bharat / state

पत्नीनं थंड भाजी वाढल्यानं पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण - Napgur Police - NAPGUR POLICE

Nagpur police क्षुल्लक कारणानं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे बिट मार्शल्सनं प्राण वाचविले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन कौतुक केलं आहे.

Nagpur police
Nagpur police beat marshal (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 9:10 AM IST

नागपूर Nagpur police - शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याचे बिट मार्शल्सला आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला अगदीचं शेवटच्या क्षणी जीव वाचवण्यात यश मिळाले आहे. पत्नीनं जेवणात गरम भाजी न वाढता थंड भाजी वाढल्यानं नाराज झालेल्या या तरुणानं रागाच्या भरात पत्नी आणि मुलांना घराबाहेर काढले. त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, म्हणतात ना "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीचा प्रत्यय नागपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे आला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेच्या पतीला बीट मार्शलकडून वाचविण्यात आलं.

एक फोन कॉल, संपूर्ण यंत्रणा लागली कामाला- नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशनचे बीट मार्शल पोलीस अंमलदार अतुल व मनोज हे सोमवारीला (6 मे) रात्री साडेआठ वाजताच्या ठक्करग्राम भागात पेट्रोलिंग करीत होते. पेट्रोलिंग दरम्यान एका महिलेने ११२ या क्रमांकावरून पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क केला. "लष्करी बाग" येथे राहणाऱ्या एका तरुणानं दारूच्या नशेत पत्नी आणि मुलांना मारहाण करत घराबाहेर काढल्याचं महिलेनं पोलीस नियंत्रण कक्षाला कळविलं. संदेश प्राप्त होताच बिटमर्शल्सने माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांना कळवली. राऊत यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून, त्या ठिकाणी त्वरित पोलीस स्टेशन हद्दीतील इतर बीट मार्शल पोलीस अमलदार देवेंद्र व प्रफुल यांना देखील लष्करी बाग येथे जाण्यासाठी सूचना दिली. ते स्वत:ही घटनास्थळी पोहोचले.

माहिती समजताचं बिट मार्शल झाले दाखल-बीटमार्शल अतुल आणि मनोज हे अवघ्या पाच मिनिटात लष्करीबाग येथे दाखल झाले. त्या ठिकाणी लोकांची गर्दी गोळा झाली होती. बीट मार्शल्सनं घराबाहेर काढलेल्या महिलेची विचारपूस केली. तिने पती दरवाजा उघड नसल्याचं सांगितले. दोन्हीही बीट मार्शल महिलेची चौकशी करत असताना आणखी २ बीट मार्शलदेखील दाखल झाले.

दार तोडून पाहिले तर पंख्याला लटकलेला तरुण- बीट मार्शलनं दरवाजा वाजवून आतून प्रतिसाद आला नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून बीट मार्शलनं घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा घरात किर्रर्रर्र अंधार होता. त्यामुळे बीट मार्शलनं स्वतःच्या मोबाईल जवळील टॉर्च सुरू करून घरात काय परिस्थिती आहे, याचा अंदाज घेतला. तेव्हा महिलेचा पती आत्महत्येचा प्रयत्न करत होता. बीट मार्शल प्रफुल आणि देवेंद्र यांनी त्या व्यक्तीचे पाय पकडले. तर अतुल यांन त्याची सुटका केली.

जेवणात गरम भाजी न दिल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न - आत्महत्येचा प्रयत्न करीत असलेला तरुण फार घाबरलेला होता. बीटमार्शलने त्याची काही वेळानं विचारपूस केली. तेव्हा आत्महत्या करण्याचं क्षुल्लक कारण पुढे आलं. पत्नीनं जेवणात गरम भाजी न देता थंड भाजी वाढली. त्यामुळे झालेल्या वादातून त्यानं टोकाचं पाऊल उचलले.

पोलीस आयुक्तांनी केलं कौतुक : घडलेल्या या घटनेनंतर त्या तरुणासह पत्नीनं तक्रार देण्यास नकार दिला. सर्व बीट मर्शल्सने कर्तव्यात तत्परता दाखवल्यानं तरुणाचा जीव वाचला. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी पोलीस स्टेशन पाचपावलीचे बीच मार्शल अतुल, मनोज, देवेंद्र व प्रफुल यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे. पोलीस आयुक्तांनी त्यांना कार्यालयात बोलवून त्यांच्या कार्याबद्दल त्यांची प्रशंसा करून केली. त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत केले आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. त्याप्रमाणं पोलिसांनी नागरिकाच्या जीविताचं रक्षण केल्यानं बीट मार्शल आणि पोलीस अधिकाऱ्यांचं कौतुक होतं आहे.

आत्महत्या हा उपाय नाही- जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील, किंवा एखाद्या मित्राबद्दल काळजी वाटत असेल अथवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी हेल्पलाईन उपलब्ध आहे. स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा iCall, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची हेल्पलाइन - 9152987821 वर कॉल करा. ही हेल्पलाईन सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत उपलब्ध आहे.

हेही वाचा-

  1. सातशेहून अधिक बेपत्ता नागरिकांचा उषा कोंडलकरांनी घेतला शोध - Nagpur City Police Usha Kondhalkar
  2. “मी नागपुरी, मला...”, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला - Devendra Fadnavis

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.