ETV Bharat / state

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी वर्षभरात पिकवला २८ लाख ६० हजारांचा शेतमाल - Nagpur Central Jail Story

Nagpur Central Jail Story : दगडी भिंती तुरुंगाला बनवत नाहीत किंवा लोखंडी सळ्या पिंजरा बनवत नाहीत, 17 व्या शतकातील एका प्रसिद्ध कवितेतील हे शब्द नागपूर मध्यवर्ती कारागृहात वेगवेगळ्या शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी खरे ठरतात. कारण नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी वर्षभरात २८ लाख ६० हजारांची शेती पिकवली आहे.

Nagpur Central Jail Story
बंदीवानांनी पिकवलेली शेती (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 10:15 PM IST

नागपूर Nagpur Central Jail Story : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी गेल्या वर्षभरात पिकवलेल्या शेतीतून तब्बल २८ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. खुले कारागृहातील बंदिवान कारागृहाच्या अखत्यारीत असलेल्या शेतात राबतात. ते कारागृहाला लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंचे उत्पादन घेतात आणि उर्वरित कृषी माल बाजारात विकून राज्य शासनाला उत्पन्न देखील मिळवून देत आहेत. नागपूर मध्यवर्ती कारागृहात १० एकर शेती आहे. या शेतीत वर्षभर हे बंदिवान वांगी, टोमॅटो, शेंगा या सारखा भाजीपाला आणि गहू तसंच इतर धान्याचं उत्पादन घेतात. बंदीवनांमध्ये असलेल्या कौशल्याला वाव देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडं विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येतात. त्याअंतर्गत शेती उपक्रमाच्या माध्यमातून यावर्षी २८ लाख ६० हजारांचे उत्पादन घेण्यात आले आहे.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी (ETV BHARAT Reporter)

बंदीवनांना स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण : जन्माने कुणीही गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते, गुन्हेगार म्हणून एकदाचा शिक्का लागला की, समाज सुद्धा त्यास जवळ करत नाही ही वस्तुस्थिती आहे. शिक्षा भोगून आलेली व्यक्ती कायम लोकांच्या नजरे तिरस्काराचा पात्र ठरते. त्यामुळं गुन्हेगार हा गुन्हेगारी जगताच्या बाहेर पडू इच्छित नाही. मात्र, ही परिस्थिती बदलण्यासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासन प्रयत्न करत आहे. याअंतर्गत बंदीवनांना स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये शेतीकाम, प्रिंटिंग काम, कार वॉशिंग सेंटर आणि लॉन्ड्री कामाचा समावेश आहे. ज्या बंदीवानास ज्या कामात रस असतो त्या बंदिवानाला ते काम करण्याची संधी दिली जाते. उदाहरणार्थ म्हणजे ज्या बंदिवान शेती कामाची आवड आहे आणि त्याला शेतीची जाण असेल तर त्याला शेतीची कामे दिली जातात.

बंदीवानांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी प्रयत्न : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्यांची शिक्षा भोगणाऱ्या बंदीवानांची संख्या ही ३ हजार पेक्षा अधिक आहे. बंदीवानांना समाजात सन्मानाचं आणि मानाचं स्थान मिळत नसलं तरी बंदीवानांच्या कठोर परिश्रम आणि सकारात्मक जिद्दीनं राज्य शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळाला आहे. भविष्यात या बंदिवानांचं पुनर्वसन व्हावं यासाठी त्यांना त्यांच्याचं आवडीची विविध कामं दिली जातात. बंदिवानसुद्धा आवडीचं काम करण्यास इच्छुक असतात. ज्यावेळी हे बंदिवान शिक्षा भोगून समाजात जातात, त्यावेळी त्यांनाही ताठ मानेनं जगता यावं यासाठी अश्या प्रकारचे अनेक उपक्रम राबवले जात असल्याची माहिती, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांनी दिलीय.

शेतीतून कारागृहाची भागवली जाते गरज : नागपूर कारागृहाकडं सध्या शेती लागवडीकरता एकूण १० एकर शेत जमीन आहे. शेतजमिनीवर बंदिवानांतर्फे शेतात गहू, कंदमुळ, वांगे, टोमॅटो, भेंडी, विविध शेंगा, मिर्ची, कोथिंबीरसह विविध प्रकारच्या भाजीपाचे पीक वर्षभर घेतले जाते.

वर्षभरात २८ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न : कारागृहातील बंदीवनांच्या जेवणासाठी लागणारा भाजीपाला, अन्न धान्याची गरज यातून भागते. उर्वरित भाजीपाला, धान्य बाजारात विक्री केला जातो. या विक्रीतून नागपूर मध्यवर्ती कारागृहाला २०२३ ते २४ या आर्थिक वर्षात तब्बल २८ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झालं आहे. याशिवाय नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोलीसह इतर कारागृहातील कैद्यांनी १ कोटी ४० लाखांचे उत्पन्न दिले आहे.

हेही वाचा -

Pune Yerawada Jail: कैद्यांनी बनवलेल्या वस्तूच्या उत्पादनात पुण्यातील येरवडा कारागृह अग्रस्थानी; वर्षभरात 2.99 कोटींची कमाई

Nagpur Railway Station : नागपूरच्या कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे अजनी स्टेशनवर प्रदर्शन

Video कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंना नागपूरकरांचा जोरदार प्रतिसाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.