ETV Bharat / state

पुण्यापाठोपाठ नागपुरातही मद्यधुंद चालकाचा 'कारनामा', भरधाव कारनं धडक दिल्यानं लहान मुलासह तिघे जखमी - nagpur accident - NAGPUR ACCIDENT

नागपूर शहरातील अत्यंत दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील झेंडा चौकात कार चालक तरुणानं तीन जणांना धडक दिली. कार चालक आणि त्याच्यासोबत गाडीत बसलेले त्याचे इतर दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते. गाडीत दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत.

nagpur accident
nagpur accident (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 7:33 AM IST

Updated : May 25, 2024, 9:33 AM IST

तिघांना अटक केल्याची माहिती (Source- ETV Bharat Reporter)

नागपूर- पुण्यापाठोपाठ नागपुरात मद्यधुंद कार चालकाचा कारनामा समोर आला. नागपुरातील कोतवाली पोलिस हद्दीतील झेंडा चौक परिसरात शुक्रवारी रात्री भरधाव वेगातील कारनं धडक दिल्यानं लहान मुलासह तीन जण जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावानं कारची तोडफोड केली आहे.

पायी जाणारे महिला, पुरुष आणि ३ महिन्याचा चिमुकला जखमी झाले आहेत. बाळाची अवस्था गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. कारमधील एकाला जमावाने बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. तर कारमधील इतर सर्वजण पळून गेले होते. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. कारमधील तिन्ही तरुण नशेत होते. ते अमली पदार्थाच्या प्रभावात होते का? यासाठी पोलीस त्यांची वैद्यकीय चाचणी करणार आहेत.

कारमधून दारूच्या बाटल्या आणि अंमली पदार्थ जप्त- भरधाव वेगानं कार चालवून अपघात करणाऱ्या चालकासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नागपूरचे डीसीपी गोरख भामरे म्हणाले, " रात्री साडेआठच्या सुमारास एका वेगवान कारने कोतवाली पोलीस स्टेशनच्या झेंडा चौक परिसरात कारनं तिघांना धडक दिली. लोकांनी एका आरोपीला पकडले. याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कारमधून दारूच्या बाटल्या आणि अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

पुण्यातील अपघाताच्या आठवणी पुन्हा ताज्या- पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री अल्पवयीन मुलानं भरधाव वेगानं कार चालवून दोघांना उडविलं. या अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्यानंतरही अल्पवयीन मुलाला लवकर जामिन मिळाला. तसेच त्याला विशेष वागणूक मिळाल्याची चर्चा असल्यानं जनतेत संतापाची लाट उसळली. त्याचा परिणाम म्हणून अखेर पोलिसांनी कारवाई करत सत्र न्यायालयात धाव घेत जामिनाला विरोध केला. अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. या अपघातानंतर दारू पिऊन वाहने चालविणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा-

  1. पुणे हिट अँड रन प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाले.... - Deputy CM Ajit Pawar
  2. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन; वरिष्ठांना वेळेत माहिती न दिल्याचा ठपका - Pune Hit and Run

Last Updated : May 25, 2024, 9:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.