नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेच्या एका दिवसानंतर, काँग्रेसनं स्पष्ट केलंय की, राज्यात महाविकास आघाडीचं 288 विधानसभा जागांपैकी सुमारे 80 टक्के जागांवर जागावाटप निश्चित झालं आहे. काँग्रेस 105 ते 110 जागा लढवण्याची शक्यता असल्यानं जागांची निवड तसंच उमेदवारांची निवड अत्यंत काळजीपूर्वक केली जात असल्याचं पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितलंय की, त्यांनी बंडखोर आणि अपक्ष उमेदवारींची शक्यता रोखण्यासाठी एक योजना आखलीय. यासाठी काँग्रेसनं हरियाणा विधानसभा निवडणुकीतून धडा घेतलाय. हरियाणात काँग्रेसनं याच कारणास्तव सुमारे 17 जागा गमावल्या होत्या.
काँग्रेसची रणनिती ठरली - राज्यातील जागावाटपाबाबत, “सुमारे 80 टक्के जागा वाटपाचं काम पूर्ण झालं आहे. उर्वरित 20 टक्के जागांवरही लवकरच निर्णय होणार आहे. चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात होत आहे आणि काही तडजोडी सामान्य मार्गानं कराव्या लागतील,” एआयसीसीचे महाराष्ट्राचे प्रभारी सचिव बी एम संदीप यांनी ईटीव्ही भारतला ही माहिती दिली. शिवसेना UBT-NCP-SP-CONGRESS या प्रमुख पक्षांचा समावेश असलेले MVA चे वरिष्ठ नेते मुंबईतील जागावाटप चर्चेचा वेग घेत असताना पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्क्रीनिंग समिती बुधवारपासून निश्चित जागांवर उमेदवारांची नावं स्पष्ट करण्यास सुरुवात करेल. या जागा काँग्रेसला मिळणार आहेत. आम्ही नावांवर चर्चा करू आणि घोषणेसाठी पहिली यादी तयार ठेवू,” असं एआयसीसीच्या वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. उर्वरित जागांसाठी, पक्षानं तैनात केलेल्या निरीक्षक आणि समन्वयकांकडून मिळालेल्या अभिप्रायांचा आधार घेऊन संभाव्य उमेदवारांची निवड केली जात आहे. "मुख्य लक्ष तीन गोष्टींवर आहे, आम्हाला हव्या असलेल्या जागांची निवड, तेथील सर्वोत्तम उमेदवार ठरवणं आणि बंडखोर किंवा अपक्ष उमेदवाराची कोणतीही शक्यता कमी करणं जे आमच्या संभाव्य विजयाला बाधा आणू शकतात," असं संदीप यांनी सांगितलं.
राज्य सरकारच्या निर्णयांवर टीका - काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मते, AICC महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी 15 ऑक्टोबर रोजी मुंबईत महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा जागांवर पक्षाने नियुक्त केलेल्या निरीक्षक आणि समन्वयकांसह एक रणनीती सत्र आयोजित केलं होतं. सर्व निरीक्षक आणि समन्वयक ज्येष्ठ होते. मधुसूदन मिस्त्री यांच्या नेतृत्वाखालील स्क्रीनिंग पॅनेलची बुधवारी दिल्लीत बैठक होणार आहे. पक्षाच्या अंतर्गत माहितीनुसार, अंतर्गत सर्वेक्षणांनी MVA साठी सुमारे 180 जागांचा अंदाज वर्तवला होता. “आम्हाला आत्मविश्वास आहे पण अति आत्मविश्वास नाही. गेल्या आठवडाभरात सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील आमच्या परिवर्तन यात्रेला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मला खात्री आहे की MVA जिंकणार आहे आणि मतदार भ्रष्ट महायुती सरकारला पराभूत करतील,” असंही सायन कोळीवाडा मतदारसंघातून तिकीट मागणारे AICC पदाधिकारी गणेश कुमार यादव यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं. एआयसीसीचे पदाधिकारी बी एम संदीप यांनी "किमान मुद्रांक शुल्क 500 रुपयांपर्यंत वाढवण्याच्या आणि 100 आणि 200 रुपयांचे मुद्रांक रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर सडकून टीका केली. "हा सामान्य माणसाला मोठा धक्का आहे आणि लोकांवर आणखी बोजा पडेल.“ यामुळे दैनंदिन व्यवहार अधिक महाग होतील. जनता आधीच महागाईशी दोन हात करत आहे., अशा वेळी घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढवणाऱ्या या लोकविरोधी धोरणाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो,” असं ते पुढे म्हणाले.
हेही वाचा..