मुंबई MVA Rally In Mumbai : महाविकास आघाडीच्या वतीनं षण्मुखानंद हॉल इथं आज सद्भावना दिवस मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मेळाव्याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज दुपारी 3 वाजता हा मेळावा होणार आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवस साजरा केला जातो. याच सद्भावना दिवसाच्या निमित्तानं महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचे सर्व प्रमुख नेते आज एकत्र येणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकांबाबत देखील चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती : याबाबत अधिक माहिती अशी की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जयंती दिवस हा सद्भावना दिवस म्हणून पाळला जातो. याच सद्भावना दिवसाच्या निमित्तानं काँग्रेसकडून सद्भावना दिवस संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याचं काँग्रेसनं शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे प्रमुख शरद पवार यांना देखील निमंत्रण दिलं आहे. हे दोन्ही प्रमुख नेते काँग्रेसच्या संकल्प मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकांबाबत देखील चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.
महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मांडणार भूमिका : सद्भावना मेळाव्यानिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज मुंबईत आहेत. या मेळाव्याचं निमंत्रण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना देखील देण्यात आल्यानं या मेळाव्यात महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते आपल्या भूमिका मांडणार आहेत. सोबतच जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल, यावर देखील या मेळाव्यात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोबतच शिवसेना ठाकरे गटानं आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या मागणीवर देखील आजच्या मेळाव्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून भूमिका जाहीर केली जाणार असल्याचं बोललं जात आहे.
उद्धव ठाकरेंकडं महाविकास आघाडीच्या प्रचाराची सर्व सूत्रं : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आता पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आली आहे. महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांमध्ये सध्या जागा वाटपावरुन चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या सद्भावना मेळाव्यात देखील विधानसभा निवडणुकांमधील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. अशातच आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं प्रचाराची सर्व सूत्रं उद्धव ठाकरे यांना दिल्यानं आजच्या मेळाव्यात नेमकं काय ठरतं? काय चर्चा होतात? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा :
- जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत मिठाचा खडा; शेकापचे दोन उमेदवार घोषित झाल्यानं आघाडीत बिघाडी? - Jayant Patil
- महाविकास आघाडीचा आर या पारचा नारा : "एक तर तू राहशील किंवा मी राहीन...", आघाडीनं फुंकलं विधानसभेचं रणशिंग - Maharashtra Assembly Election 2024
- "घरांच्या मोळ्या जाळून मतांच्या पोळ्या भाजता, म्हणून तुम्हाला गाडणार"; उद्धव ठाकरेंनी पुन्हा डागली तोफ, मुख्यमंत्री चेहऱ्यावरुन केलं मोठं भाष्य - MVA Nirdhar Melava Mumbai