छत्रपती संभाजीनगर : गंगापूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमदार सतीश चव्हाण यांना शनिवारी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांबरोबरच मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. निष्ठेनं पक्षाचं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर हा अन्याय करण्यात आला आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी एका संयुक्तीक पत्राद्वारे खुलासा केला.
सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीला विरोध : "गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार दिनांक शनिवारी जयंत पाटील यांनी जाहीर केला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी 14 ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन स्थानिकांना डावलून आयात उमेदवारांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली होती. याबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना प्रत्यक्ष भेटुन निवेदन दिलं. यावेळी त्यांनी सतिश चव्हाण यांचा आपल्या महाविकास आघाडीशी कोणताही संबंध नाही. त्यांना उमेदवारी देण्यात येणार नाही, असं सांगितलं होतं. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विनायक राऊत, बाळासाहेब थोरात, मिलींद नार्वेकर यांच्या भेटी घेऊन निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. याप्रसंगी या सर्व नेत्यांनी तुम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. परंतु दुर्दैवानं तसं घडलं नाही," असं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
जागा भाजपाकडं गेल्यानं नाईलाजानं झाला : महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मी अजित पवार यांच्यासोबत विकास निधी आणि इतर कामासाठी गेलो होतो. तसेच महायुतीत ही जागा भाजपाकडं गेल्यामुळे मला नाईलाजास्तव शरदचंद्र पवार पक्षामार्फत महाविकास आघाडीची उमेदवारी घ्यावी लागली. त्यामुळे आम्ही यापूर्वी ठरवल्याप्रमाणं मनोज जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणं सर्व इच्छुक उमेदवार संयुक्तरित्या उमेदवारी अर्ज भरणार आहोत.
हेही वाचा :
- विधानसभा निवडणूक 2024; 'या' मतदार संघात प्रशांत बंब आणि सतीश चव्हाण यांच्यात थेट लढत ?, जाणून घ्या काय आहेत समीकरणं ?
- Satish Chavan औरंगाबादला कृषी विद्यापीठ फक्त फडणवीस आणू शकतात- राष्ट्रवादीच्या आमदाराला विश्वास
- Former MLA Bhausaheb Patil Chichtgaonkar : राष्ट्रवादीमधील गटबाजी चव्हाट्यावर, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांनी हे केले आरोप