ठाणे Thane Murder News : दारूची पार्टी (Alcohol Party) सुरू असतानाच दोघांमध्ये उसनवारीच्या पैश्यावरून वाद होऊन सहा जणांच्या टोळक्याने २५ वर्षीय तरुणाचा खून केल्याची (Murder News) धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी भागात घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kolsewadi Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासातच दोन हल्लेखोरांसह एका बालकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
हल्लेखोरांचे नावे : यातील तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. रुपेश महादेव कांबळे (वय १९, रा. सूचक नाका, कोळशेवाडी कल्याण पूर्व), मोहन रमेश बनसोडे (वय १८, रा. रा. महात्मा फुले नगर झोपडपट्टी, सुचक नाका, कोळशेवाडी कल्याण पूर्व.) आणि एक बालक असे अटक केलेल्या हल्लेखोरांची नावं आहेत. सुरज सोमा हिलम (वय २५ ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुचक नाका, कल्याण पूर्व भागातील सुचक नाका परिसरात मृतक सुरज सोमा हिलम हा कुटुंबासह राहात होता. त्यातच २ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास नेतिवली टेकडी भागात एका बारमध्ये मद्यपान करत होता. त्यावेळी आरोपीही त्याच्यासोबत दारू पार्टी करत होते. दारू पीत असतानाच आरोपी आणि मृतकमध्ये उसनवारीच्या पैश्यावरून वाद झाला. दारू ढोसल्यानंतर हा वाद आणखीच विकोपाला गेला. त्यानंतर अनोळखी ६ इसमांनी लाकडी फळीनं, झाडूनं आणि दगड फेकून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले. याप्रकरणी मयतचा भाऊ नामे पिंट्या सोमा हिलम याचे फिर्यादीवरून कोळशेवाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे २ एप्रिल रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपींना सापळा रचून घेतलं ताब्यात : गुन्ह्याच्या घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि पोलीस अमंलदार यांनी तत्काळ भेट देवून नमूद गुन्ह्याचा समांतर कल्याण गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस पथकानं सुरू करून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. शिवाय घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न होताच, गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार मिथुन राठोड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे २ संशयीत आरोपीत आणि एक बालक हे सुचक नाका, रिक्षा स्टॅन्ड जवळ कल्याण पूर्व येथे येणार आहेत. सदर बातमीच्या अनुषंगानं त्या घटकातील पोलीस अधिकरी आणि अंमलदार यांनी सापळा रचून कारवाई करून गुन्ह्यातील आरोपी रुपेश महादेव कांबळे, मोहन रमेश बनसोडे, १ बालक यांना सापळा रचून ताब्यात घेतल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.
यांनी बजावली कामगिरी : हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नरेश पवार, सपोनि संदीप चव्हाण, दत्ताराम भोसले, अनुप कामत, किशोर पाटील, दीपक महाजन, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, विनोद चन्ने, गुरूनाथ जरग, गोरक्ष शेकडे, रविंद्र लांडगे, अमोल बोरकर या पोलीस पथकानं कामगिरी बजावली आहे.
हेही वाचा -
- परीक्षा सुरू असताना प्रश्नांची उत्तरं देण्यास नकार देणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यावर भर रस्त्यात चाकू हल्ला - Thane Crime News
- चिमुरड्याचं अपहरण, खंडणी अन् निर्घृण हत्या; मोबाईल लोकेशनमुळं आरोपी सापडले, दोन भावांना अटक - Boy Killed For Ransom
- सुपारी देऊन नवऱ्याची हत्या, पत्नीला अटक होताच कारण आलं समोर