ETV Bharat / state

रेल्वे पकडताना वांद्रे रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, दोन प्रवासी गंभीर जखमी

वांद्रे रेल्वे स्टेशनवर गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत दोन गंभीर जखमी झाले आहेत.

Mumbai railway station stampede
संग्रहित छायाचित्र (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 11 hours ago

Updated : 9 hours ago

मुंबई- वांद्रे रेल्वे स्टेशनवर फलाट क्रमांक एक येथे गर्दीत प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली. प्लॅटफॉर्मवर गर्दी झाल्यानं ही चेंगराचिंगरी झाली. वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस ट्रेन पकडताना ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटनेत नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना भाभा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. सात जणांची प्रकृती स्थिर असून दोन जण गंभीर जखमी आहेत.

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या सणासुदीच्या दिवसात गावाला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. संपूर्ण देशभरात दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. तर, उत्तरेकडे छट पूजेची धामधूम आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतून देशभरात विविध विशेष गाड्या सोडण्यात येत आहे. असले असले तरी प्रवासांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच काही गाड्या उशिरा धावत असल्यानं रेल्वे स्थानकांवर गावाला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीत गोरखपूर एक्सप्रेसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे.

वांद्रे ते गोरखपूर रेल्वे पकडण्यासाठी गर्दी (Source- ETV Bharat)

नऊ जण जखमी- याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील वांद्रे टर्मिनस स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. ही घटना मध्यरात्री 2 वाजता घडल्याचं प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्या सणासुदीला अनेक प्रवाशी आपल्या राज्यातील मूळगावी परतण्याकरिता मुंबईतील स्थानकावर गर्दी करताना दिसून येत आहेत. वांद्रे रेल्वे स्थानकारवरील सर्व प्रवासी वांद्रे गोरखपूर एक्सप्रेसची वाट पाहात होते. जेव्हा गाडी फलाटावर आली त्यावेळी पटकन रेल्वे डब्यात चढून जागा अडवण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू झाली. या धावपळीत चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत नऊ जण जखमी झाले आहेत.

  • ट्रेन क्रमांक 22921, वांद्रे गोरखपूर एक्स्प्रेसची सुटण्याची वेळ पहाटे 5.10 वाजता होती. परंतु ट्रेन 2.55 वाजता प्लॅटफॉर्मवर पोहोचली. अशा स्थितीत प्रवाशांनी पटकन ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न सुरू केल्यानं चेंगराचेंगरी झाली.

ही आहेत जखमींची नावे- या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आता समोर आली आहेत. शाबीर अब्दुल रहमान (40), परमेश्वर सुखदार गुप्ता (28), रवींद्र हरिहर चुमा (30), रामसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती (29), संजय तिलकराम कांगे (27), दिव्यांशु योगेंद्र यादव (18), मोहम्मद शरीफ, शेख (25), इंद्रजित सहानी (19) आणि नूर मोहम्मद शेख (18) अशी जखमींची नावे आहेत.

हेही वाचा-

  1. कल्याण स्थानकावर लोकलचा डबा रुळावरून घसरला, चाकरमान्यांची तारांबळ
  2. रेल्वे स्टेशनवरील कामात भ्रष्टाचार झाल्याचा प्रियंका गांधींचा आरोप, कोकण रेल्वेनं फेटाळला दावा

Last Updated : 9 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.