ETV Bharat / state

ट्रॅक्टरला धडक दिल्यानंतर वारकऱ्यांची बस दरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी घेतली जखमींची भेट - Mumbai Highway Accident News - MUMBAI HIGHWAY ACCIDENT NEWS

Mumbai Accident : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या बसचा पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला.

Mumbai Highway Accident
वारकऱयांच्या बसला अपघात (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 7:46 AM IST

Updated : Jul 16, 2024, 9:32 PM IST

मुंबई Mumbai Highway Accident : पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबई - पुणे महामार्गाजवळ हा अपघात झाला असून यात 5 जणांचा मृत्यू झाला. तर 42 भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. चालकाचे गाडीवरील निमंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त हे भाविक केसर गावातून खासगी बसनं पंढरपूरला जात होते.

मुंबई - पुणे महामार्गाजवळ बसची ट्रॅक्टरला धडक (Source - ETV Bharat Reporter)

पाच जणांचा मृत्यू : अपघाताची माहिती देताना नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे म्हणाले की, "सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे - एक्सप्रेस वेवर अपघात झाला. आषाढी एकादशीनिमित्त 54 जण मुंबईहून पंढरपूरला जात होते. प्रवाशांनी भरलेली ही बस अचानक ट्रॅक्टरला धडकून दरीत कोसळली. या अपघातात जखमी झालेल्या 42 भाविकांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं असून 3 जणांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यातील 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांनी 5 जणांना मृत घोषित केलं आहे."

जखमींची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट : डोंबिवलीवरून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या बसचा अपघात झाला. अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, 8 प्रवासी गंभीर जखमी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेत विचारपूस केली. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर केली असून, जखमींचा संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हंटले.

असा झाला अपघात : पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली येथील 54 प्रवाशांना घेऊन एक बस सोमवारी मुंबईतून पुण्याच्या दिशेने निघाली होती. रात्री ही बस पनवेल हद्दीत आली असता मुंबई - पुणे महामार्गावर अचानकपणे बस समोर एक ट्रॅक्टर आला. या कारणाने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस ट्रकटरला धडकून 20 फूट खोल दरीमध्ये कोसळली.

ट्रॅक्टर चालक नो एन्ट्री मध्ये चालवत होता गाडी : ट्रॅक्टर चालक तरवेज सलाउद्दीन अहमद (वय 28 वर्ष) हा मुंबई - पुणे महामार्गावर नो एन्ट्री मध्ये पहिल्या लेनने ट्रॅक्टर चालवीत होता. भाविकांना घेऊन जाणारा बस चालक संजय पाटील (वय 54 वर्ष) हा डोंबिवली ते पंढरपूर ही बस भरधाव वेगाने चालवित होता. पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात बस चालक संजय यांचे बसवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. यात तरवेज सलाउद्दीन अहमद व त्याच्या सोबत असलेला अनोळख्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टरला धडक मारल्यानंतर डाव्या साईटच्या रेलिंग तोडून 20 फूट खाली जाऊन बस पलटी झाली. बस मधील प्रवासी गुरुनाथ बाबू पाटील (वय 70 वर्ष) रामदास नारायण मुकादम (वय 70 वर्ष) हंसाबाई हरी पाटील (वय 67 वर्ष)जागीच मृत झाले असून बाबुराव धर्मा भोईर (वय 70 वर्ष) मामा पोगया भोईर (वय 70 वर्ष ) गणपत जोग्या मुकादम (वय 70 वर्ष) संजय बापूराव पाटील (वय 63 वर्ष) सुमन साळुंखे (वय 60 वर्ष) हे गंभीर जखमी झाले आहेत.

महामार्गावर ट्रॅक्टर आलाच कसा? : मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. जखमींना ताबडतोब एमजीएम रुग्णालय तसेच पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. सर्व जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. महामार्गावर ट्रॅक्टरला बंदी असताना ट्रॅक्टर महामार्गावर आलाच कसा? पोलीस यंत्रणा यादरम्यान कार्यरत नव्हती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच मदतकार्य पूर्ण झाल्यावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

हेही वाचा

  1. धबधबा पाहण्याकरिता थांबल्यानंतर 7 वाहनांना कंटेनरची धडक, अपघातानंतर नाशिकमध्ये पर्यटकांकरिता नवीन नियम - Accident In Kasara Ghat
  2. बसचे ब्रेक फेल झाले अन् सत्संगला जाणाऱ्या चौघांना चिरडले, चिमुकल्याचा जागीच मृत्यू - Bus Crushed Child

Last Updated : Jul 16, 2024, 9:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.