ETV Bharat / state

वरळी हिट अँड रन प्रकरणाचा 'सीन रिक्रियेट' होणार; आरोपी आणि ड्रायव्हरच्या जबाबात विसंगती - Worli Hit And Run Case - WORLI HIT AND RUN CASE

Worli Hit And Run Case : मुंबई पोलीस वरळी हिट अँड रन प्रकरणाचं सीन रिक्रियेशन करणार आहेत. अटक आरोपी मिहीर शाह तसंच ड्रायव्हर राजर्षी बिदावत यांनी दिलेल्या जबाबात विसंगती आढळून आली. तसंच पोलीस दोघांची समोरासमोर चौकशी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, अपघातावेळी मिहीरच गाडी चालवत असल्याचं त्यानं कबुल केलं.

Etv Bharat
वरळी हिट अँड रन प्रकरण (ETV Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 11, 2024, 3:32 PM IST

Updated : Jul 11, 2024, 3:53 PM IST

मुंबई Worli Hit And Run Case : मुंबई पोलीस वरळी हिट अँड रन प्रकरणाच्या तपासासाठी अपघाताचं दृश्य पुन्हा तयार (सीन रिक्रियेट) करण्याच्या तयारीत आहेत. यासोबतच अटक आरोपी मिहीर शाह तसंच ड्रायव्हर राजर्षी बिदावत यांची समोरासमोर चौकशी करण्याची पोलिसांची योजना आहे, कारण दोघांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात विरोधाभास असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलं. मिहीरनं पोलिसांना कबुली दिली आहे की, अपघातावेळी तो कार चालवत होता, मात्र तो दारूच्या नशेत नव्हता.

आरोपी घटनेनंतर फरार : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. फरार झाल्यानंतर मिहीरनं मुंबई ते नाशिक, इगतपुरी, गणेशपुरी त्यानंतर ठाणे असा प्रवास करत अखेर विरार गाठलं होतं. दरम्यान, मिहीरची आई, दोन्ही बहिणी तसंच एक मित्र ठाणे, मुरबाडमार्गे शहापूरला पोहोचले होते. प्रत्येक ठिकाणी त्यांना कोणी मदत केली याचा तपास पोलीस करत आहेत. यावेळी मिहीरनं आपला मोबाईल लपवून ठेवला असून, पोलीस त्याच्या फोनचा शोध घेत आहेत.

अटक टाळण्यासाठी कापले केस : मंगळवारी मुंबई गुन्हे शाखा युनिट 3 नं मिहीरची आई, दोन बहिणी तसंच एका मित्राला शाहपूर येथील एका रिसॉर्टमधून ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून एकूण 12 मोबाईल जप्त केल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे. गुन्हे शाखेनं त्यांना ताब्यात घेऊन वरळी पोलिसांच्या ताब्यात दिलं. वरळीतील अपघातानंतर मिहीर लगेच पळून गेला होता. यावेळी अटक टाळण्यासाठी त्यानं केस कापले होते. बुधवारी मिहीरला शिवडी न्यायालयात मुख्य महानगर दंडाधिकारी एसपी भोसले यांच्यासमोर हजर केलं असता, त्यांनी सुनावणीनंतर त्याला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

त्यानं केलेला गुन्हा क्रूर : न्यायालयीन सुनावणीदरम्यान, मुंबई पोलिसांनी हा एक क्रूर गुन्हा असल्याचं सांगितलं. आरोपींना जास्तीत जास्त काळ कोठडीत ठेवावं. त्यांना पळून जाण्यास कोणी मदत केली याचा तपास करणे, आवश्यक असून गाडीची नंबर प्लेट अद्याप जप्त करणं बाकी आहे. रविवारी सकाळी वरळी परिसरात कावेरी नाखवा (45) हिला धडकलेली बीएमडब्ल्यू कार मिहीर शाह चालवत होता, असं समोर आलं आहे.

अपघाताचं सीन रिक्रियेट होणार : मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर मिहीर गोरेगाव येथे आपल्या प्रेयसीच्या घरी पळाला होता. तेथून बहीण पूजासह ठाण्यात लपून राहिला. त्यानंतर मिहीरची आई वीणा, बहीण पूजा आणि किंजल तसेच मित्र अवधीप यांच्यासोबत मिहीर शहापूरच्या रिसॉर्टवर लपून बसला होता. मिहीर सोडून इतर चौघांना या रिसॉर्टवरून पोलिसांनी ताब्यात घेतलं. या चौघांचेही जबाब नवीन कायद्यानुसार ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. मंगळवारी मध्यरात्री कारचालक बिडावत याला वरळी पोलिसांनी अपघात घडलेल्या ठिकाणी नेलं होतं. त्याचप्रमाणे मंगळवारी रात्री मिहीरला अटक केल्यानंतर जबाब नोंदवण्यात आला. मात्र, बिडावत आणि मिहीर यांच्या जबाबात तफावत आढळून आली. या दोघांनाही रात्री घटनास्थळावर नेण्यात आलं होतं.

हे वाचलंत का :

  1. वरळी हिट अँड रन प्रकरण : आरोपी मिहिर शाहला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, पीडित कुटुंबाला 10 लाख देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा - Worli hit and run case
  2. "मिहिर शहा हा राक्षसच..."; वरळी हिट अँड रन प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी घेतली भेट - Worli Hit and Run
  3. वरळी हिट अँड रन प्रकरण : राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय - Rajesh Shah in worli hit run case

Last Updated : Jul 11, 2024, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.