मुंबई : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एसआयटीच्या चौकशीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते आणि त्यानुसार वेळोवेळी मुंबई पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे साहिल खानने सांगितले. आता पुन्हा महादेव बेटिंग अँप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला मंगळवारी पुढील चौकशीसाठी बोलवले आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा साहिल खानची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. मंगळवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकासमोर साहिल खान हजर राहणार असल्याची माहिती साहिलचे वकील मुजाहिद अन्सारी यांनी दिली आहे.
शनिवारी झाली होती चौकशी : गेल्या शनिवारी साहिल खान चौकशीला हजर राहिला. मी उपस्थित राहिलो आणि तपासात सहकार्य केले. यापुढेही चौकशीला हजर राहून सहकार्य करणार असल्याची माहिती अभिनेता साहिल खान याने ईटीव्ही भारतशी बोलताना दिली होती. साहिल खान त्यावेळी दुपारी अडीज वाजता सीपी ऑफिसमध्ये आला आणि चौकशी झाल्यानंतर साडेपाच वाजता निघाला. तब्ब्ल तीन तास साहिल खानची चौकशी पार पडली होती.
अटकेपासून अंतरिम दिलासा : याआधीही एसआयटीने साहिल खानला चौकशीसाठी डिसेंबर महिन्यात समन्स बजावले होते. मात्र, त्यावेळी तो दुबईमध्ये होता. त्यामुळं हजर झाला नव्हता आणि अटक टाळण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. उच्च न्यायालयानं त्याला अटकेपासून अंतरिम दिलासा दिला होता. हा गुन्हा मुंबईच्या माटुंगा पोलिसांनी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रथम नोंदवला. त्यानंतर तो तपासासाठी गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे वर्ग करण्यात आला आणि त्यानंतर एसआयटी स्थापन करून तपास पुढे करण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकाला अटक करण्यात आली आहे, मुंबई पोलिसांनी महादेव बेटिंग ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उपल, सुभम सोनी यांच्यासह 35 जणांविरुद्ध 15 हजार कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -