ETV Bharat / state

प्रसाद पुजारीला आणखी एका केसमध्ये अटक, पुजारीची कर्नाटकात 11 एकर जमीन - gangster Prasad Pujari - GANGSTER PRASAD PUJARI

Gangster Prasad Pujari : कुख्यात गुंड प्रसाद पुजारीची कर्नाटकात 11 एकर जमीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रसाद पुजारीला चीनमधून 23 मार्च रोजी भारतात आणण्यात आलं होतं. मुंबईत पुजारीवर खून, तसंच खंडणीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत.

Gangster Prasad Pujari
Gangster Prasad Pujari
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 10:31 PM IST

मुंबई Gangster Prasad Pujari : कुख्यात गुंड प्रसाद पुजारीबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पुजारीची कर्नाटकात 11 एकर जमीन आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कर्नाटकातील उडिपी येथील मूळगावी प्रसाद पुजारीने 11 एकर जमीन खरीदी केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. येत्या काही दिवसांत मुंबई पोलीस ही मालमत्ता जप्त करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती पोलीस अधिकारी दत्तात्रय नाळे यांनी दिली आहे.

पुजारीची चौकशी सुरू : 23 मार्चला सकाळी प्रसाद पुजारीला (वय 44) चीनमधून प्रत्यार्पण करून मुंबईत आणण्यात आलं होतं. त्यावेळी मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली होती. सुरुवातीला गँगस्टर कुमार पिल्लाई गॅंगसाठी काम करणाऱ्या प्रसाद पुजारीला तब्बल वीस वर्षांनी भारतात आणण्यास मुंबई पोलिसांना यश आलं होतं. सध्या पुजारी मुंबई पोलिसांच्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीत बरेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

चीनमधील प्रत्यार्पणनंतर गोळीबार प्रकरणात अटक : चीनमधील प्रत्यार्पणनंतर प्रसाद पुजारीला विक्रोळी परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आली होती. विक्रोळी येथील व्यापारी चंद्रकांत जाधव यांच्यावर प्रसाद पुजारीच्या साथीदारांनी 19 डिसेंबर 2019 रोजी गोळीबार केला होता. या प्रकरणी कलम 307, 452 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात प्रसाद पुजारीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सहआयुक्त लखमी गौतम यांनी दिली होती. या प्रकरणी विशेष मोक्का न्यायालयानं 2019 मध्ये 7 जणांना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. या गुन्ह्यात एका व्यावसायिकाला मलेशियाहून पुजारीनं फोन करून 10 कोटींची खंडणी मागितली होती.

आईला भेटायची इच्छा : तसंच 2003 मध्ये नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये प्रसाद पुजारीनं जवळपास 100 ते 150 व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळली असल्याचं चौकशीत निष्पन्न झालं आहे. प्रसाद पुजारीनं पोलिसांकडं त्याच्या आईला भेटायची इच्छा व्यक्त केली आहे. प्रसाद पुजारीच्या आईनं विक्रोळीत झालेल्या गोळीबाराच्यावेळी आरोपींना अडीच लाख रुपये दिल्याचं स्पष्ट झालं असून त्यावेळी पुजारीच्या आईला अटक करण्यात आली होती. प्रसाद पुजारीनं पाठवलेल्या पैशापैकी हे अडीज लाख आरोपींना दिल्याचं देखील प्रसाद पुजारीच्या चौकशीत उघडकीस आले आहे.

हे वाचलंत का :

  1. गँगस्टर प्रसाद पुजारी चीनमध्ये चालवत होता मोबाईल शॉपी - Gangster Prasad Pujari
  2. मोस्ट वाँटेड गँगस्टर प्रसाद पुजारीचं चीनमधून भारतात प्रत्यार्पण; मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर यश - Gangster Prasad Pujari
  3. Gangster Prasad Pujari : प्रसाद पुजारीच्या भारतात प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला आला वेग; चीनहून मुंबईत आणणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.