ETV Bharat / state

ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळ बॉम्बनं उडवून देणार; मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला धमकीचा फोन - Mumbai Police Threat Call - MUMBAI POLICE THREAT CALL

Mumbai Police Threat Call : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. मुंबईतील ताज हॉटेल (Taj Hotels) आणि मुंबई विमानतळ (Mumbai Airport) बॉम्बनं उडवण्याच्या धमकीचा कॉल मुंबई पोलिसांना आल्यानं खळबळ उडाली आहे.

Threat call
बॉम्ब ठेवल्याचा नियंत्रण कक्षाला फोन (MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 7:49 PM IST

Updated : May 27, 2024, 8:25 PM IST

मुंबई Mumbai Police Threat Call : सोमवारी मुंबई पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा कॉल आल्यानं, मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मुंबईतील कुलाब्यातील प्रसिद्ध असे ताज हॉटेल (Taj Hotels) आणि मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) बॉम्ब ठेवल्याचं फोन करणाऱ्यानं सांगितलं आणि लगेच कॉल कट केला. तर कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या शोध सुरू असल्याची माहिती, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलीय.

मुंबई विमानतळवर शोध सुरू : या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळ या ठिकाणी शोध घेतला. मात्र काहीही संशयास्पद आढळलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कॉल उत्तर प्रदेशातून आला आहे.

या आधीही आला होता कॉल : याआधीही मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला अशाच प्रकारे हॉक्स कॉल आला होता. त्यावेळी अज्ञात कॉलरनं मुंबई पोलिसांना अलर्ट करत ३५० किलो आरडीएक्स पाकिस्तानहून मुंबईत आले असून ते विमानतळ आणि रेल्वे स्थानकांसह इतर ठिकाणी आरडीएक्स ठेवण्यात येणार असल्याची माहिती, पोलीस अधिकारी मिलिंद काटे यांनी दिली होती.

मुंबई पोलिसांना हॉक्स कॉल : सोलापूर जिल्ह्यात कुर्डुवाडी येथे राहणारा गिरम या इसमाचा मोबाईल फोनचा वापर हॉक्स कॉलरनं केला होता. मुंबई पोलिसांनी गिरम यांना संपर्क साधला असता त्यानं त्याचा मोबाईल फोन चोरीला गेला असल्याचं सांगितलं. अंध असलेल्या गिरम यांचा मोबाईल फोन चोरट्यांनी लंपास करून त्यावरून मुंबई पोलिसांना हॉक्स कॉल केला असल्याचं प्रथमदर्शनी प्राथमिक तपासात पोलिसांना आढळून आलं होतं.

बॉम्बची बातमी खोटी निघाली : गिरम हे ट्रेनमध्ये चणे शेंगदाणे विकण्याचं काम करत असल्याची माहिती, मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसेच सोमवारी एका अज्ञात व्यक्तीनं सांगली पोलिसांना फोन करून मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या रेल्वे स्थानकांवर पाच जण बॉम्ब ठेवणार असल्याची माहिती दिली. या माहितीनंतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र शोध घेतल्यानंतरही काहीही संशयास्पद आढळलं नाही. बॉम्बची बातमी पूर्णपणे खोटी निघाली. याप्रकरणी सांगली पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती पूर्णपणे अफवा असल्याचं म्हटलं होतं. या धमकीच्या कॉलच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सांगली रेल्वे स्थानकाचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व परिसराची पाहणी केली होती.

हेही वाचा -

  1. साताऱ्यात दहशतवादी असल्याच्या फोनमुळं पोलिसांची उडाली धावपळ, पुढे काय घडलं? वाचा बातमी
  2. नवीन वर्षाच्या जल्लोषावर विरजण : मायानगरीत बॉम्बस्फोट घडवण्याची मुंबई पोलिसांना धमकी
  3. Mumbai Hoax call : चाळीत बॉम्ब ठेवल्याचा कॉल करणारा सापडताच पोलिसही चक्रावले..हट्ट पाहून काढली समजूत

Last Updated : May 27, 2024, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.