ETV Bharat / state

मुंबईतील करोडपती निघाले कर बुडवे; प्रॉपर्टी टॅक्स न भरणाऱ्या 3605 मालमत्तांवर पालिकेची कारवाई

काही करोडपती लोकांनी अद्याप मालमत्ता कर भरला नसल्याचं उघड झालंय. आता बृहन्मुंबई महापालिकेने या टॉप 10 करबुडव्यांची यादीच प्रसिद्ध केलीय.

Municipal property tax has been scuttled
महापालिकेचा मालमत्ता कर बुडवला (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

मुंबई - मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. इथे अनेक लोक स्वप्न घेऊन येतात, त्यातील काहींची स्वप्न पूर्ण होतात, तर काहींना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. याच मुंबईत अगदी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या लोकांपासून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपर्यंत अनेक करोडपती राहतात. मात्र, आता हेच करोडपती कर बुडवे असल्याचं समोर आलंय. महानगरपालिका सगळ्यांकडूनच प्रॉपर्टी टॅक्स आकारते. त्यातील सामान्य माणसांनी आपला मालमत्ता कर भरलेला असून, काही करोडपती लोकांनी अद्याप मालमत्ता कर भरला नसल्याचं उघड झालंय. आता बृहन्मुंबई महापालिकेने या टॉप 10 करबुडव्यांची यादीच प्रसिद्ध केलीय.

मालमत्ता धारकांना सध्या नोटिसा बजावणं सुरू : पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मालमत्ताकर थकवणाऱ्या मालमत्ता धारकांना सध्या नोटिसा बजावणं सुरू असून, बृहन्मुंबई महापालिकेने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून मालमत्ता कर न भरलेल्या 3605 मालमत्ता जप्त केल्यात. मालमत्ता जप्त केल्यानंतर देखील या प्रॉपर्टी टॅक्स थकवणाऱ्यांनी आपल्या मालमत्ता कर न भरल्यास मालमत्तांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिलीय. तर काही मालमत्तांचा लिलाव सुरू करण्यात आल्याचंदेखील पालिकेनं म्हटलंय.

6 हजार 200 कोटी रुपये कर संकलन उद्दिष्‍ट : कर निर्धारण आणि संकलन विभागाने वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षात 6 हजार 200 कोटी रुपये कर संकलन उद्दिष्‍ट निश्चित केलंय. त्‍या दृष्‍टीने पालिकेची विविध पातळ्यांवर कारवाई सुरू आहे. निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना कलम 203 अन्वये जप्‍तीची नोटीस बजावण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिलीय. विहीत मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित मालमत्तेवर कलम 203, 204, 205, 206 अन्वये प्रथमतः मालमत्तेतील महागड्या वस्तू जप्त करून लिलाव केला जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक 2592/2013 च्या अंतरिम आदेशान्वये येणारा कर वसूल न झाल्यास मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिलीय.

90 मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री : पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2024 ते 25 नोव्‍हेंबर 2024 अखेरपर्यंत बृहन्मुंबई महापालिकेच्या 24 प्रशासकीय विभागामधील कर थकवणाऱ्या 3 हजार 605 मालमत्ताधारकांवर मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 203 नुसार, जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आलीय. जप्ती आणि अटकावणीची कारवाई झालेल्या 90 मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करण्याची कारवाई सुरू करण्‍यात आल्याचे पालिकेने म्हटलंय.

प्रॉपर्टी टॅक्स न भरणाऱ्या टॉप 10 करोडपती करबुडव्यांची यादी

1) मेसर्स सेजल शक्‍ती रिअॅल्‍टर्स (एफ उत्तर विभाग) - 14 कोटी 85 लाख 99 हजार 208 रुपये
2) लक्ष्‍मी कमर्शियल प्रीमायसेस (जी उत्‍तर विभाग) - 14 कोटी 29 लाख 90 हजार 121 रुपये
3) मेसर्स एशियन हॉटेल्‍स् लिमिटेड (के पूर्व विभाग) - 14 कोटी 18 लाख 92 हजार 302 रुपये
4) सहारा हॉटेल्‍स् (के पूर्व विभाग) - 13 कोटी 93 लाख 50 हजार 963 रुपये
5) मेसर्स न्यूमॅक अँड रिओडर जे. व्ही. (एफ उत्तर विभाग) - 13 कोटी 45 लाख 44 हजार 812 रुपये
6) मेसर्स फोरमोस्‍ट रिअॅल्‍टर्स प्रायव्‍हेट लिमिटेड (एच पूर्व विभाग) - 12 कोटी 50 लाख 90 हजार 139 रुपये
7) श्री साई पवन को - ऑपरेटिव्‍ह हाऊसिंग सोसायटी (के पश्चिम विभाग) - 11 कोटी 69 लाख 45 हजार 058 रुपये
8) कमला मिल्‍स लिमिटेड (जी दक्षिण विभाग) - 11 कोटी 47 लाख 25 हजार 130 रुपये
9) श्री एल. एन. गडोदिया अँड सन्‍स लिमिटेड (एच पश्चिम विभाग) - 11 कोटी 44 लाख 97 हजार 582 रुपये
10) मोहित कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनी (के पश्चिम विभाग) - 11 कोटी 26 लाख 56 हजार 267 रुपये

हेही वाचा-

  1. विधानसभा निवडणूक मुदत संपल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागते का? घटनातज्ज्ञ म्हणतात...
  2. ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेते पदावर दावा? विधिमंडळ सचिवांची घेतली भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.