ETV Bharat / state

मुंबईकरांना मनस्ताप! लोकलच्या तिन्ही महामार्गावर आज मेगा ब्लॉक - Mumbai Mega Block

मेगा ब्लॉकमुळे मुंबई आणि पुण्यातील चाकरमान्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. मध्य रेल्वे मार्ग, हार्बर रेल्वे, पश्चिम रेल्वे या मार्गावर मेगा ब्लॉग मुळे लोकल रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. तसेच पुण्यातदेखील मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गाड्या उशीरा धावणार आहेत.

Mumbai Mega Block
मध्य रेल्वे मार्ग, हार्बर रेल्वे, पश्चिम रेल्वे माहामार्गावर मेगाब्लॉग (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 12:14 PM IST

Updated : Jun 9, 2024, 12:26 PM IST

मुंबई Mumbai Mega Block: मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांना आज मनस्ताप सहन करावं लागणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज(९ जून) ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणे मधील तांत्रिक कामांकरिता मेगा ब्लॉक असणार आहे. परिणामी प्रवास करताना प्रवाशांना मेगा ब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. यामुळे लोकलच वेळापत्रक तपासूनच बाहेर पडावे. तसच ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

रविवार आणि शनिवारी तसेच सुट्टीच्या दिवशी लोकांची वर्दळ कमी असते. परंतु नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी मेगा ब्लॉकचा फटका बसणार हे निश्चित आहे. गेल्या आठवड्यातच मध्य रेल्वेकडून विशेष मेगा ब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते. तीनही उपनगरीय लोकल सेवेवर रविवारी मेगाब्लॉक राहणार आहे.

कुठं किती तास ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर पाच तासाचा मेगाब्लॉक: पश्चिम रेल्वेवर रेल्वेचा ट्रॅक सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांचा मेंटेनन्सकरण्यासाठी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक असणार आहे. जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. सकाळी 10.35 वाजल्यापासून ते दुपारी 15.35 वाजेपर्यंत आप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या दादर आणि वांद्रे स्थानकात शॉर्ट टर्मिनेटेड रिव्हर्स करण्यात येणार आहे. पाच तासांचा हा मेगा ब्लॉक असणार आहे.

हार्बर मार्गांवरील ब्लॉक: लोकल मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी असा ब्लॉक राहील तर वांद्रे अप- डाऊन मार्गावर हा मेगाब्लॉक राहील. सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. या कालावधीत सीएसएमटी - पनवेल, बेलापूर वाशी अपडाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द केली आहे. तर गोरेगाव वांद्रे येथून सीएसएमटीसाठी जाणारी अप हार्बर लाइन वरील सेवा बंद राहणार आहे. पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक दरम्यान दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुख्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेवर ब्लॉक: मध्य रेल्वेवर वरील विविध अभियांत्रिकी आणि देखभाली संदर्भातील काम पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 11.04 ते दुपारी 2.46 पर्यंत डाउन धीमी सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येईल. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबणार,पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळविले जाणार आहे.

पुणे विभागात मेगा ब्लॉक: मध्य रेल्वे, पुणे विभागातर्फे आज म्हणजे रविवारी (९ जून)रोजी मेगा ब्लॉग घेतला आहे. यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही उशिरा धावणार आहे. कामशेत-तळेगाव दरम्यान किलोमीटर 154/0-1 वर असलेल्या पुलाच्या लोखंडी गर्डरच्या जागी 6 आरसीसी सेगमेंटल बॉक्स टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हा ब्लॉक घेण्यात आला आहे.

पुणे-लोणावळा-पुणे विभागातील उपनगरी सेवा रद्द

  • गाडी क्रमांक 01564 पुणे-लोणावळा लोकल
  • गाडी क्रमांक 01561 लोणावळा-पुणे लोकल
  • गाडी क्रमांक 01563 लोणावळा-शिवाजी नगर- लोकल
  • गाडी क्रमांक 01566 पुणे-लोणावळा लोकल
  • गाडी क्रमांक 01588 शिवाजी नगर-तळेगाव लोकल
  • गाडी क्रमांक 01589 तळेगांव-पुणे लोकल

धावणाऱ्या या गाड्या रद्द

  • गाडी क्रमांक 11007 मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 11008 पुणे - मुंबई डेक्कन एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12123 मुंबई - पुणे डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12124 पुणे- मुंबई डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस

या गाड्या धावणार उशिरा

  • 12164 एमजीआर चेन्नई- मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस जेसीओ (8 जून) 3 तास 30 मिनिटांकरिता रेग्यूलेट करण्यात येईल.
  • 22159 मुंबई- चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस जेसीओ (9 जून) 00.30 मिनिटांकरिता रेग्यूलेट करण्यात येईल.
  • 17222 लोकमान्य तिलक टर्मिनस - काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस जेसीओ (9 जून) 00.15 मिनिटांकरिता रेग्यूलेट करण्यात येईल.
  • 16332 तिरुवनंतपुरम मुंबई-एक्सप्रेस जेसीओ (8 जून) रोजी 00.15 मिनिटांकरिता रेग्यूलेट करण्यात येईल.
  • 22943 दौंड-इंदौर एक्सप्रेस जेसीओ (9 जून) रोजी 00.15 मिनिटांकरिता रेग्यूलेट करण्यात येईल

हेही वाचा

  1. मेगा ब्लॉकचा फटका मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांना, कोणत्या परीक्षा झाल्या रद्द, जाणून घ्या - Mumbai Mega Block Effect
  2. Mumbai Local Mega Block : उद्या मुंबईत मेगाब्लॉक...मध्य, हार्बरच्या प्रवाशांना टेन्शन! वाचा वेळापत्रक
  3. Mumbai Mega Block News: मुंबईकरांनो घराबाहेर जाण्यापूर्वी हे रेल्वेचे वेळापत्रक पाहा, आज तिन्ही मार्गावर आहे मेगाब्लॉक

Last Updated : Jun 9, 2024, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.