ETV Bharat / state

पेट्रोल पंप असल्यामुळे बचाव कार्यात अडथळा, आणखी काहीजण होर्डिंगखाली अडकल्याची भीती - Ghatkopar Hording Collapsed - GHATKOPAR HORDING COLLAPSED

Ghatkopar Hording Collapsed : घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 14 वर गेल्याची माहिती समोर आली आहे. तसंच 88 जणांपैकी 74 जणांना वाचवण्यात यश आलं असून घटनास्थळी अद्यापही मदतकार्य जारी असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकानं (NDRF) दिली आहे. कोसळण्यात आलेलं होर्डिंग बेकायदेशीर असल्याची माहिती समोर येत आहे.

Ghatkopar Hording Collapsed
घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 14 वर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 14, 2024, 7:48 AM IST

Updated : May 14, 2024, 12:04 PM IST

घाटकोपरमधील महाकाय होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू (ANI)

मुंबई Ghatkopar Hording Collapsed : घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) एका जाहिरात एजन्सीला उर्वरित तीन होर्डिंग्ज तात्काळ हटवण्यास सांगितलं आहे. बीएमसीनं जाहिरात एजन्सीला उर्वरित बेकायदेशीर तीन होर्डिंग्ज ताबडतोब काढून टाकण्यास सांगितल्याची माहिती अधिकाऱ्यानं दिली.

सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) यांनी रेल्वे पोलीस आयुक्त, मुंबई यांच्या वतीनं सोमवारी कोसळलेल्या ठिकाणी चार होर्डिंग्ज उभारण्यास परवानगी दिली होती. परंतु बीएमसीकडून अधिकृत परवानगी किंवा एनओसी देण्यात आली नव्हती, असं सांगण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी इगो मीडियाचे मालक आणि इतरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोसळलेला होर्डिंग बेकायदेशीर होता. हा होर्डिंग लावण्यासाठी कोणतीही बीएमसीकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच या घटनेत 88 जणांपैकी 74 जणांना बाहेर काढण्यात आलं असून सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एनडीआरएफचे सहाय्यक कमांडंट निखिल मुधोळकर म्हणतात, " दुर्घटनेतून एकूण 88 लोकांना वाचवण्यात आले. त्यापैकी 14 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. येथे एक पेट्रोल पंप असल्यामुळे गॅसवर चालण्यात येणारे कटर वापरता येत नााही. ही एक समस्या आहे." एनडीआरएफ आपदा मित्र रेस्क्यूअर, शाबाज शेख म्हणाले "जवळपास सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आम्ही सुमारे 80 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. एक लाल कारचे खूप नुकसान झाले. कारमध्ये काही लोक अडकल्याची भीती आहे."

घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपावर होर्डिंग्स कोसळल्यानं अनेक वाहनं दबली (reporter)

74 जणांना बाहेर काढण्यात यश : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकानं (NDRF) दिलेल्या माहितीनुसार घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यात वाढ होऊन, हा आकडा 14 वर गेलाय. तसंच या ठिकाणी अडकलेल्या 88 जणांपैकी 74 जणांना बाहेर काढण्यात यश आल्याचंही एनडीआरएफकडून सांगण्यात आले.

जखमींवर सरकारकडून उपचार : घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, "यात 100 जण अडकल्याची माहिती मिळत आहे. त्यातून 51 जणांना सुखरूप बाहेर काढलंय. तसंच अजूनही 35 ते 40 जण खाली अडकले असून यात आठ जणांचा मृत्यू झालाय. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि या घटनेची चौकशी करण्यात येईल. जे याला जबाबदार असतील, त्या संबंधितावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच "जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य तो उपचार होतोय की नाही, याची चौकशी करण्यात येईल. जो उपचाराचा खर्च आहे तो सर्व सरकारकडून करण्यात येईल."

नेमकं काय घडलं? : अचानक झालेल्या मुसळधार अवकाळी पावसानं सोमवारी (13 मे) मुंबईत मोठा अपघात घडला. घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळं पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. होर्डिंगखाली जवळपास 80 वाहनं अडकले. या होर्डिंगखाली 100 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून आत्तापर्यंत 74 जणांना बाहेर काढलंय. जखमींना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर दुर्घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा -

  1. घाटकोपर दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू; घटनेची चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार; मुख्यमंत्र्यांची माहिती - Mumbai Rain
  2. मुंबईत वादळी वाऱ्यामुळं दोन दुर्घटना; पेट्रोलपंपावर होर्डिंग्स कोसळल्यानं अनेक वाहनं दबली तर सुमारे 35 जण जखमी - Heavy Rain in Mumabi
  3. मुंबईतील घाटकोपर परिसरात भूस्खलनाची घटना; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, पाहा व्हिडिओ - Landslide in Ghatkopar

Last Updated : May 14, 2024, 12:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.