मुंबई Mumbai Building Fire : मुंबईत शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. मुंबईच्या लोअर परळ पश्चिम भागात असलेल्या टाइम्स टॉवर इमारतीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या 9 गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) आगीच्या घटनेला दुजोरा दिला.
आगीचं कारण अस्पष्ट : टाइम्स टॉवर ही परळ पश्चिमेतील आठ मजली व्यावसायिक इमारत आहे. लोअर परळच्या कमला मिल कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या टाइम्स टॉवरमध्ये सकाळी 6.30 च्या सुमारास आग लागली. आग आटोक्यात आल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितलं, मात्र वायर आणि एसीमध्ये आग लागल्यानं अजूनही धुराचे लोट दिसत आहेत. आग इतकी भीषण आहे की, काचेचं टॉव्हर असल्यामुळं काचा आणि काही सामान खाली कोसळलं. घटनास्थळी मुंबई पोलीस आणि रुग्णवाहिका देखील दाखल झाली होती. शर्थिच्या प्रयत्नांनंतर मुंबईच्या लोअर परळ परिसरातील इमारतीत लागलेली आग नियंत्रणात आली आहे. मात्र, ही आग कशी लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
#WATCH | Maharashtra | Fire breaks out in Times Tower building located in Lower Parel West, Mumbai. 9 fire tenders rushed to the spot, no injuries reported. Firefighting operations are underway. pic.twitter.com/hszAhYtZ78
— ANI (@ANI) September 6, 2024
तात्पुरती कारवाई केली जाते : कमला मील परिसरामध्ये अनेक अनधिकृत बांधकामं उभी राहिलेली आहेत. त्यामुळं अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. आग लागण्याची घटना घडल्यानंतर तात्पुरती कारवाई केली जाते. त्यानंतर पुन्हा अशाच घटना समोर येत आहेत. वारंवार अशा घटना घडू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी देखील मनसेच्या वतीनं करण्यात आलीय.
Maharashtra | Fire breaks out in Times Tower building located in Lower Parel West, Mumbai. 9 fire tenders rushed to the spot, no injuries reported. Fire fighting operations underway: BMC
— ANI (@ANI) September 6, 2024
याआधी 29 डिसेंबर 2017 रोजी कमला मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंटमध्ये आग लागली होती. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 19 जण गंभीर जखमी झाले होते. कमला मिल व्यावसायिक इमारत आहे. यात जवळपास 34 रेस्टॉरंट, बार आणि अनेक कंपन्यांची कार्यालयं आहेत.
हेही वाचा
- अटल सेतूवरुन उडी मारुन बँकरनं संपवलं जीवन ; कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप - Pune Banker Commits Suicide
- बदलापूर पुन्हा हादरलं; रेल्वे स्थानकात अंदाधूंद गोळीबार, प्रवाशांना मोठा धक्का - Badlapur Firing
- विनयभंगाच्या गुन्ह्यातील विधीसंघर्ष बालक वाहनातून उडी मारून फरार; पोलिसांची धावाधाव - Child Accused Escaped Police