मुंबई : दादर (मध्य) रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, रविवारी रात्री १२. ०५ वाजता दादर येथून सुटणाऱ्या तुतारी एक्सप्रेसमध्ये एक मोठी सुटकेस टाकताना व्यक्ती आढळली. त्यावेळी प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी हजर असलेल्या पोलिसांना या बॅगेबाबत संशय आला. त्यावर पोलिसांनी त्या बॅगेची तपासणी केली असतात त्यात मृतदेह आढळून आला. याबाबत मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली. तर पायधुनी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची उकल झाली आहे.
पायधुनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी जय प्रवीण चावडा आणि त्याचा दुसरा सहकारी शिवजित सुरेंद्र सिंग नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी मिळून कुर्ला येथील रहिवाशी असलेल्या अर्शद शेख याचा खून केला होता. हत्येनंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुतारी एक्सप्रेस ट्रेनने जात होते.
आरोपी पळून जाता अटक-रेल्वे पोलीस पथकानं संशयास्पद बॅगची तपासणी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना बॅगेत एक मृतदेह सापडला. याबाबत दादर पोलिसांनी एफआयआर नोंदवला गेला. पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपी शिवजितला उल्हासनगर रेल्वे स्थानकातून अटक केली. तर दुसरा आरोपी चावडा याला दादर रेल्वे स्थानकातून बॅगेसह अटक केली आहे. आरोपी जनरल डब्यात जाण्यासाठी रांगेत होते. त्यावेळी बॅगेची तपासणी करताना शिवजीतने पळ काढला. तर दुसरा आरोपी चावडाला पोलिसांनी अटक केली.
दोन्ही आरोपी मूकबधिर- एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्य आरोपी आणि मृत व्यक्तीत आरोपीच्या मैत्रिणीवरून भांडण झाले होते. त्यानंतर आरोपींनी त्याला पायधुनी येथील किका रस्त्यावरील घरी दारुच्या पार्टीसाठी बोलावले. त्यादरम्यान आरोपीनं त्यांच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीनं तो मृतदेह सुटकेसमध्ये भरला. त्यानंतर ते घरातून निघून गेले. बाहेर काहीही दिसू नये म्हणून मृतदेह पूर्णपणे प्लास्टिकमध्ये बांधलेला होता. मात्र, रेल्वे पोलिसांनी बॅग तपासणीदरम्यान आरोपींना पकडले. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत अर्शदसह दोन्ही आरोपी मूकबधिर आहेत. त्यांची भाषा अवगत असलेल्या व्यक्तींची मदत घेऊन पोलीस चौकशी करत आहेत.
हेही वाचा-