ETV Bharat / state

कर्ज घेऊन बनावट कागदपत्रांद्वारे फायनान्स कंपनीची फसवणूक, 'असा' प्रकार आला उघडकीस - Forged Documents Fraud

Finance Company Fraud: मोतीलाल ओसवाल फायनान्स लिमिटेडकडे गहाण ठेवलेल्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी दाेन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Forged Documents Fraud) दादर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी कोणतीही माहिती न देता ज्या कागदपत्रांवर कर्ज काढले आणि ते कागदपत्र दुसऱ्याला विकले. याबाबत कंपनीनं तक्रार केली होती, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बागडीकर यांनी दिली आहे.

Finance Company Fraud
विक्री प्रकरणी गुन्हा दाखल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 9:54 PM IST

मुंबई Finance Company Fraud : दादर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोतीलाल ओसवाल फायनान्स लिमिटेडमध्ये (Motilal Oswal Finance) वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करणाऱ्या फिर्यादी निधी शेट्टी (वय 29) यांनी रमाकांत सुभाष जाधव आणि केतन बाबूलाल पटेल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शेट्टी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कर्मा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक जाधव आणि पटेल यांनी प्रकल्प सुरू करण्यासाठी कंपनीत कर्जासाठी अर्ज केला होता. कासगाव तालुका शहापूर, जिल्हा ठाणे येथे प्रकल्प सुरू करण्यासाठी जाधव आणि पटेल यांनी कंपनीत 158.73 कोटी रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता.

दोघांनीही कर्जाचे हप्ते भरणे बंद केले: कर्ज घेण्यासाठी जाधव आणि पटेल यांनी त्यांची पालघर, शहापूर आणि कल्याणची जमीन ओसवाल यांच्या बँकेकडे गहाण ठेवली होती. या कर्जासाठी दोघांनी कर्जाची परतफेड न केल्यास ओसवाल कंपनीला मालमत्ता विकण्याचे अधिकारही दिले होते. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, दोघांनीही कर्जाचे हप्ते भरणं बंद केलं. त्यानंतर कंपनीने शहापूरच्या मालमत्तेची चौकशी केली असता दोघांनी शहापूरची जमीन सुभाष दगडखेर आणि रामनाथ कारभारी यांना विकल्याचं समजलं.

जाधव, पटेलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल: पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, विकलेल्या मालमत्तेची किंमत 4 कोटी रुपये आहे. जाधव आणि पटेल यांनी जमिनीची कागदपत्रे सुरक्षा म्हणून कंपनीकडे जमा केली होती. मालमत्ता विकल्याची माहिती मिळताच फायनान्स कंपनीने याप्रकरणी एफआयआर दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी जाधव आणि पटेल यांच्याविरुद्ध चार कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या दोघांविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ३४, ४२०, ४६५, ४६७, ४६८ आणि ४७१ अन्वये एफआयआर नोंदवला आहे.

फायनान्स कंपनीला न सांगता जमीन विकली: जाधव आणि पटेल यांनी 2014 मध्ये हे कर्ज घेतले होते. 2023 पर्यंत बँकेचा कोणताही हप्ता भरला नाही. दादर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, शहापूरमध्ये 4 हेक्टरपेक्षा जास्त जमीन, कल्याणमध्ये 37820 चौरस मीटर आणि पालघरमध्ये 1,19,443 चौरस मीटर जमीन आहे. या जमिनीवर आरोपींनी फायनान्स कंपनीकडून पैसे घेऊन शहापूर येथील जमीन फायनान्स कंपनीला न सांगता विकली होती.

हेही वाचा:

  1. लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; भाजपाच्या माजी नगरसेवकावर बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा
  2. हेमंत सोरेन यांची तुरुंगात रवानगी होताच चंपाई सोरेन यांचा सत्ता स्थापनेचा दावा, राज्यपालांची घेतली भेट
  3. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा घंटानाद, रोहित पवार यांची ईडी कार्यलयात पुन्हा चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.