ETV Bharat / state

कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोन्ही दोषींना जन्मठेप, मुंबई सत्र न्यायालयानं ठोठावली शिक्षा - Kirti Vyas Murder Case - KIRTI VYAS MURDER CASE

Kirti Vyas Murder Case : 2018 मधील कीर्ती व्यास हत्येप्रकरणी आरोपी सिद्धेश ताम्हणकर (Siddhesh Tamhankar) आणि खुशी सजवानी (Khushi Sahjwani) या दोन्ही आरोपींना आज मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

Life Imprisonment To Accused
दोन्ही दोषींना जन्मठेपची शिक्षा (MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 4:03 PM IST

मुंबई Kirti Vyas Murder Case : कीर्ती व्यास हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court) सिध्देश ताम्हणकर (Siddhesh Tamhankar) आणि खुशी सेजवानी (Khushi Sahjwani) या दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सोमवारी न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी दोन्ही आरोपींना हत्येप्रकरणी दोषी ठरवलं होतं. 16 मार्च 2018 ला कीर्तीची हत्या करण्यात आली होती. अभिनेता फरहान अख्तरची भूतपूर्व पत्नी अधुनाच्या कार्यालयात कीर्ती फायनान्स व्यवस्थापक पदी कार्यरत होती. कीर्ती गायब झाल्याची तक्रार दाखल झाल्यावर पोलिस तिचा शोध घेत होते. कीर्तीचे कार्यालयीन सहकारी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानी यांच्यावर तिच्या हत्येचा आरोप होता.

कीर्तीचा मृतदेह अद्याप सापडला नाही : सिध्देश आणि खुशीला कीर्तीची हत्या, अपहरण आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं होतं. 2018 मध्ये कीर्ती बेपत्ता झाली होती. कीर्तीचा मृतदेह पोलिसांना अद्याप सापडलेला नाही. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अवधूत चिमलकर यांनी काम पाहिलं. सिध्देश आणि खुशी या दोन्ही आरोपींची कोणतीही गुन्हेगारी पूर्वपीठिका नसल्यानं त्यांना कठोर शिक्षा देऊ नये अशी विनंती त्यांच्यामार्फत करण्यात आली होती. दोघांचे कुटुंबीय त्यांच्यावर अवलंबून असल्याचा मुद्दा बचाव पक्षाच्या वकिलांनी मांडला.

असा केला युक्तिवाद : मात्र चिमलकर यांनी त्यांचे मुद्दे खोडून काढले आणि ही हत्या अत्यंत थंड डोक्यानं करण्यात आल्याकडं न्यायालयाचं लक्ष वेधलं. कीर्ती व्यास देखील तिच्या कुटुंबियांचा एकमेव आर्थिक आधार होती, असा युक्तिवाद केलाय. पूर्ण खटल्यादरम्यान सिध्देशला जामीन मिळाला नाही. तर खुशीला 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला होता. सोमवारी तिला दोषी ठरवण्यात आल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलं.

जन्मठेपेची दिली शिक्षा : या खटल्यात खुशीच्या कारमध्ये मिळालेले कीर्तीच्या रक्ताचे डाग, सीसीटीव्ही चित्रिकरण आणि मोबाईल कॉल रेकॉर्डिंगवर सरकारी पक्षानं खटला लढवला. मृतदेह सापडलेला नसताना देखील जन्मठेपेची शिक्षा देण्यात यश मिळालं. सिध्देशला कीर्तीनं असमाधानकारक कामामुळं नोटिस दिली होती. त्यामुळं चिडलेल्या सिध्देशने खुशीची मदत घेऊन तिची हत्या केल्याचा पोलिसांनी आरोप केला होता. सिध्देश आणि खुशीच्या संबंधाची माहिती कीर्तीला होती हा देखील संशयाचा मुद्दा ठरला. या प्रकरणात 962 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. तर शिक्षा ठोठावण्यापूर्वी खुशीनं न्यायाधीशांसमोर अश्रू ढाळत आपल्याला शिक्षा न देण्याची विनंती केली.

हेही वाचा -

कीर्ती व्यास हत्या प्रकरण; सिद्धेश ताम्हणकर, खुशी सजवानी ठरले दोषी - मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय - Kirti Vyas Murder Case

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला दिलासा ; रणजीत सिंह हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून दोषमुक्त - Ram Rahim Acquitted In Murder Case

लैला खान हत्याकांड; लैला खान आणि इतर भावंडांचा डीएनए केवळ आईशी जुळला, अद्याप बाप नाही कळला, सत्र न्यायालय शुक्रवारी शिक्षा ठोठावणार - Laila Khan Murder Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.