मुंबई- नौदलाच्या बोटीच्या अपघातानंतर अद्याप दोघेजण बेपत्ता आहेत. नौदल आणि तटरक्षक दलाच्या मदतीनं शोधमोहीम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 43 वर्षीय हंसराज भाटी आणि सात वर्षीय जोहान मोहम्मद निसार अहमद पठाण अशी बेपत्ता झालेल्या दोघांची नावे आहेत. बोट अपघातात दोन्ही बोटीतील 113 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला. तर दोन जखमींसह 98 जणांना वाचवण्यात यश आले.
बुधवारी दुपारी गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा बेटावर 100 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या 'नील कमल' या बोटीचा अपघात झाला. नौदलाच्या क्राफ्टने धडक दिल्यानं नौदलाचा एक कर्मचारी आणि दोन कंत्राटी नौदल कर्मचाऱ्यांसह 13 जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या आजूबाजूच्या सर्वात भीषण सागरी आपत्तींपैकी एकामध्ये, 13 लोकांचा मृत्यू झाला होता, तर आणखी 105 जणांना वाचवण्यात आले होते, जेव्हा 'नीलकमल' ही गेटवे ऑफ इंडिया येथून प्रसिद्ध युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळातील एलिफंटा बेटांकडे जात होती. तेव्हा अपघात झाला.

यापूर्वीदेखील महाराष्ट्रात बोटीचे भीषण अपघात झाले आहेत.
- 21.05.2024: महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवरील उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये 7 जणांना घेऊन जाणारी बोट खराब हवामानामुळे उलटली. या दुर्घटनेत 22 मे 2024 रोजी 5 व्यक्तींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
- 14.09.2021 : अमरावतीत नदीत बोट उलटून तीन जणांपेक्षा जास्त मृत्यू झाला.
- 14.03.2020: महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मांडवा समुद्रकिनाऱ्यावर कोसळलेल्या बोटीतील सर्व 78 प्रवाशांची सुटका करण्यात आली.
- 11.08.2019: सांगली जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला.
- 16.01.2019: महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात नर्मदा नदीत बोट उलटल्याच्या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला.
- 24.10.2018: मुंबईजवळील अरबी समुद्रातील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाची पाहणीला जात असताना सुमारे 25 जणांना घेऊन जाणारी स्पीड बोट पाण्याखालील खडकावर आदळली. यात एकाचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले.
- 13.01.2018 : मुंबईपासून सुमारे 135 किमी अंतरावर पारनाका बीचजवळ डहाणूच्या किनाऱ्यावर 40 शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली. यात बोट उलटल्यानं 3 जणांचा मृत्यू झाला.
हेही वाचा-