ETV Bharat / state

आनंदाची बातमी! 'लाडक्या बहिणीला' रक्षाबंधनापूर्वीच ओवाळणी मिळणार, पहिला हफ्ता 'या' दिवशी मिळणार - mazi ladki bahin yojana - MAZI LADKI BAHIN YOJANA

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर कधी जाहीर होणार, याबाबत महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण
mukhyamantri ladki bahin yojana news (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 7, 2024, 7:00 PM IST

मुंबई Mukhyamantri Ladki Bahin Yojana - 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेतील अर्ज राज्यभरात युद्धपातळीवर भरले जात आहेत. कारण, अर्ज दाखल करण्याची 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे गाव-खेड्यात अंगणवाडी, शासन सेवा केंद्र तसेच ऑनलाईन पद्धतीनं मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले जात आहेत. आता या योजनेबाबत आनंदाची बातमी समोर येत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे पहिले दोन हप्ते रक्षाबंधनापूर्वीच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. या योजनेचे पैसे 19 ऑगस्ट रोजी खात्यावर येणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं होते. मात्र, आता 17 ऑगस्टला पहिले दोन हफ्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळं एकप्रकारे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणीला ओवाळणी मिळणार आहे.

17 ऑगस्टला खात्यात 3 हजार रुपये जमा होणार- राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याचसोबत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्याचे 3 हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीला रक्षाबंधनपूर्वीच ओवाळणी मिळणार असल्यामुळं योजनेसाठी अर्ज भरणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

17 ऑगस्टला भव्य-दिव्य कार्यक्रम - दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या खात्यात 17 ऑगस्ट रोजी 3 हजार रुपये जमा होणार आहेत. या दिवशी राज्य सरकारकडून भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जाणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन उपमुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर असणार आहेत. या दिवशी दोन ते अडीच कोटी महिलांना पहिल्या हप्त्याचे पैसे वितरण करण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये योजनेसंदर्भातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कार्यक्रमाला पालकमंत्रीदेखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

  • आतापर्यंत किती अर्ज दाखल? - मंगळवारपर्यंत दीड कोटी ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. तर एक कोटी ऑफलाईन अर्ज दाखल झाले आहेत. केवळ 7 हजार अर्ज कागदपत्रांच्या अभावी अपात्र ठरवण्यात आले आहेत. परंतु अपात्र झालेले अर्ज 31 ऑगस्टपर्यंत पुन्हा भरता येणार आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा ? : या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला, जन्मदाखला, रेशनकार्ड, बँक खाते आधार क्रमांकाला लिंक असणं गरजेचं आहे. तसेच योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र आणि पासपोर्ट आकाराचे फोटो एवढी कागदपत्रे असणे गरजेचं आहे. हा अर्ज ऑनलाईनही भरून कागदपत्रे सबमिट करणं सोपं आहे. तसेच आपले सरकार सेतू सुविधा केंद्रावरूनही अर्ज दाखल करता येतात.

हेही वाचा-

  1. चार बायका असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार का - मनसे - Mazi Ladki Bahin Yojana
  2. महिलांमध्ये गोंधळाची परिस्थिती; राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची वस्तुस्थिती काय? - Mukhyamantri Ladki Bahin Yojana

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.