ETV Bharat / state

अधिकारी होण्याकरिता अभ्यासाला लागा, एमपीएससीकडून पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, 524 जागाकरिता नोकरीची संधी - mpsc exam date 2024

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे सुधारित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केलं आहे. ही परीक्षा आता 6 जुलै 2024 रोजी होणार आहे.

MPSC exam dates
MPSC exam dates (Source- ETV Bharat Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 8:13 AM IST

Updated : May 9, 2024, 8:19 AM IST

मुंबई-तुम्ही सरकारी नोकरीकरिता संधीची वाट पाहात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र सेवा आयोगाकडून 524 जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध संवर्गातील एकूण 524 पदे भरण्यात येणार आहे. या सुधारित परीक्षेचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेत स्थळावर देण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात डिसेंबर, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा दिनांक 28 एप्रिल, 2024 रोजी घेण्यात येणार होती. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम 2024, 26 फेब्रुवारी, 2024 नुसार पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षणाची तरतूद लागू करण्यात आली. या तरतुदीनुसार परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य सरकारनं केल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सेवा आयोगानं बदल करत परीक्षा पुढे ढकलली होती.

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेकरिता महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सादर करण्याचा कालावधी- 9 मे, 2024 रोजी दुपारी 2 ते दिनांक 24 मे, 2024 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 24 मे, 2024 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत आहे.
  • भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची शेवटची तारीख 26 मे, 2024 रोजी 11 वाजून 59 मिनिटापर्यंत आहे.
  • चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 27 मे, 2024 रोजी आहे.

पदे आणि संख्या

(एक) राज्य सेवा परीक्षा :- एकूण पदे 431

(1) उप जिल्हाधिकारी, गट-अ (एकूण 07 पदे)

(2) सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ (एकूण 116 पदे)

(3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (एकूण 52 पदे)

(4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (एकूण 43 पदे)

(5) सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट-अ (एकूण 03 पदे)

(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (एकूण 07 पदे)

(7) सहायक कामगार आयुक्त, गट - अ (एकूण 02 पदे),

(8) सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट - अ (एकूण 01 पद),

(9) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब (एकूण 19 पदे),

(10) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (एकूण 25 पदे),

(11) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 1 पदे),

(12) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 5 पदे),

(13) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट-ब (एकूण 07 पदे),

(14) सरकारी कामगार अधिकारी, गट - ब (एकूण 04 पदे),

(15)सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट-ब (एकूण 04 पदे),

(16) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब (एकूण 7 पदे),

(17) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब (एकूण 52 पदे),

(18) निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब (एकूण 76 पदे),(दोन )

(दोन) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा - महसूल व वन विभाग (एकूण48 पदे)

(1) सहायक वनसंरक्षक, गट-अ, (एकूण 32 पदे) ,(2) वनक्षेत्रपाल, गट-ब, (एकूण 16 पदे)

(तीन ) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल संधारण विभाग (एकूण 45 पदे)

(1) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-अ, (एकूण 23 पदे)

(2) जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब, (एकूण 22 पदे

एमपीएससीच्या परीक्षेबाबत अधिकृत माहिती आणि त्यात होणारे बदल एमपीएससीच्या संकेतस्थळावर देण्यात येतात. त्यासंदर्भात विद्यार्थ्यांनी एमपीएससीचे या http://www.mpsc.gov.in या संकेतस्थळावरून वेळोवेळी माहिती घ्यावी.

हेही वाचा-

  1. राज्यातील शेकडो कृषी पदवीधरांना मोठा दिलासा, 5 मार्चपर्यंत नियुक्ती नाही, उच्च न्यायालयाचे आदेश
  2. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 चा निकाल जाहीर, विनायक पाटील राज्यात प्रथम
  3. एमपीएससी परीक्षेत पूजा वंजारी मुलींमध्ये राज्यात प्रथम, निकाल पाहून डोळ्यात आनंदाश्रू

Last Updated : May 9, 2024, 8:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.