ETV Bharat / state

खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल - नवनीत राणांना धमकी

Death Threat To Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना थेट पाकिस्तान मधून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या स्वरूपाची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

MP Navneet Rana
खासदार नवनीत राणा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 8:28 PM IST

खासदार नवनीत राणा यांना मिळालेल्या धमकीबाबत बोलताना आमदार रवी राणा

अमरावती Death Threat To Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना थेट पाकिस्तान मधून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. विशेष म्हणजे, नवनीत राणा यांच्या व्हाट्सअपवर व्हॉइस मेसेज पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना देखील पाहून घेऊ, अशा स्वरूपाचं वक्तव्य धमकी देणाऱ्यानं केलं असल्याची तक्रार खासदार नवनीत राणा यांचे स्वीय सचिव विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात दिली आहे.

अश्लील भाषेत वक्तव्य : खासदार नवनीत राणा यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर एका मोबाईल क्रमांकावरून 3 मार्च रोजी ऑडिओ क्लिप पाठवण्यात आली. या ऑडिओ क्लिपमध्ये खासदार नवनीत राणा यांच्याबाबत अतिशय अश्लील भाषेचा वापर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना देखील आम्ही पाहून घेऊ अशा स्वरूपाची धमकी या व्हाट्सअप ऑडिओ क्लिपमध्ये आहे. दुसऱ्या एका ऑडिओ क्लिपमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत आणि खासदार नवनीत राणा यांना ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे.

ओवेसींच्या कार्यकर्त्यांनीही दिल्या होत्या धमक्या : नवनीत राणा यांनी लोकसभेत ज्याप्रमाणे हिंदुत्वाचे विचार 'जय श्री रामा'च्या घोषणा देत प्रखरपणे मांडले त्याला 'एमआयएम'चे खासदार ओवेसी यांचा विरोध होता. त्यानंतर संभाजीनगरचे खासदार इम्तियाज अली यांनी देखील अनेक सभेत नवनीत राणा यांना दम दिला होता. तसंच टीका देखील केली होती. ओवेसींच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा नवनीत राणा यांना धमकी देखील दिली; मात्र आम्ही त्याला भीक घातली नसल्याचं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानातून धमकी ही गंभीर बाब : नवनीत राणा यांच्या सर्व कार्यक्रमांची आम्ही रेकी करीत आहोत. रेकीच्या माध्यमातून त्यांच्यावर आमचे पूर्ण लक्ष आहे. येणाऱ्या काळात त्या कुठे उडून जाईल हे सांगता देखील येत नाही. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह यांना जीवे मारण्याची धमकी देण्यासह देशात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी थेट पाकिस्तानातून मिळणं ही अतिशय गंभीर बाब असल्याचं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे.

ओवेसींचा पाकिस्तानशी संबंध आहे का : ज्याप्रमाणे ओवेसी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात भूमिका घेत आहे तशा स्वरूपाची धमकी पाकिस्तानातून मिळाली असल्यामुळं ओवेसी यांचे पाकिस्तानशी काही कनेक्शन आहेत का? असा प्रश्न देखील आमदार रवी राणा यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रीय आणि राज्याच्या तपास यंत्रणा तपास घेत आहेत. राज्याच्या डी जी रश्मी शुक्ला यांना देखील या संदर्भात माहिती देण्यात आली असून त्यांनी देखील या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी देखील या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती दिली आहे. तपास यंत्रणा निश्चितच ओवेसींचा तपास करतील आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे का? हे देखील उघड करतील असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. भाजपाचा 400 पार'चा नारा! मात्र, जागा वाटपाचं सुत्र बिघडलं; अजित पवार गटामुळे पेच प्रसंग
  2. नारी शक्ती! पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीपर्यंतच्या पहिल्याच मेट्रोचं स्टेअरिंग महिला पायलटच्या हाती
  3. मुंबई महानगरपालिकेतील 'त्या' अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी विजय वडेट्टीवार यांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.