ETV Bharat / state

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोरबे धरण भरलं; नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी केलं जलपूजन - Morbe Dam Overflows - MORBE DAM OVERFLOWS

Morbe Dam Overflows : नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारं मोरबे धरण भरलं आहे. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी मोरबे धरणाचं जलपूजन केलं. यावेळी धरणातून पाण्याचा विसर्गही करण्यात आला. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहनही यावेळी अधिकाऱ्यांनी केलं.

Morbe Dam Overflows
अधिकाऱ्यांनी केलं जलपूजन (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2024, 10:47 AM IST

नवी मुंबई Morbe Dam Overflows : स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर स्वत:च्या मालकीचं धरण असणारी नवी मुंबई ही एकमेव महानगरपालिका असून मोरबे धरणामुळे नवी मुंबई ही जलसमृध्द महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर खालापूर तालुक्यात असलेलं 450 दललि प्रतिदिन क्षमतेचं मोरबे धरण पूर्ण भरलं असून शुक्रवारी आमदार गणेश नाईक आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते मोरबे धरण प्रकल्पस्थळी पारंपरिक पद्धतीनं जलपूजन करण्यात आलं. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. तसेच माजी महापौर जयवंत सुतार आणि सुधाकर सोनवणे, माजी नगरसेवक विनोद म्हात्रे उपस्थित होते.

मुंबईनंतर नवी मुंबई ही स्वमालकीचं धरण असणारी एकमेव महानगरपालिका : मुंबईनंतर नवी मुंबई ही स्वत:च्या मालकीचं धरण असणारी एकमेव महानगरपालिका आहे. हा दूरदृष्टीचा निर्णय असल्याचं मत व्यक्त करत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याच्या इतर जलस्त्रोतांचा शोध घेण्याची आवश्यकता आहे, असं यावेळी सांगितलं. नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ कैलास शिंदे यांनी मोरबे धरण यावर्षी ऑगस्ट महिन्यातच पूर्ण भरले असून ही आपल्या नवी मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे. ही निसर्गाची कृपा असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. नवी मुंबईकरांना स्वच्छ, शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीनं समन्यायी जलवितरण व्यवस्था करण्यात येत आहे. भविष्यात लोकसंख्येची वाढ लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

धरण क्षेत्रात उत्तम पर्जन्यवृष्टी : मोरबे धरण क्षेत्रात यावर्षी उत्तम पर्जन्यवृष्टी झाली असून अत्यंत कमी कालावधित म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस धरण पूर्ण भरलेलं आहे. या क्षेत्रात आजतागायत 3,374 मिमी पावसाची नोंद झालेली असून पाण्याची पातळी पूर्ण 88 मीटर इतकी भरलेली आहे. धरणात 191.463 द.ल.घ.मी. इतका जलसाठा असून त्यामधील पाण्याचा आज विसर्ग करण्यात आला. अशाच प्रकारे प्रत्येक वर्षी मोरबे धरणातील जलसाठा पूर्ण भरावा, अशी मनोकामना करत जलपूजन संपन्न झालं. मोरबे धरणामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला, तरी सुज्ञ नवी मुंबईकर नागरिकांनी पाण्याचं महत्त्व ओळखून पाण्याचा काटकसरीनं वापर करावा, असं आवाहनही यावेळी अधिकाऱ्यांनी केलं आहे.

हेही वाचा :

  1. अप्पर वर्धा धरणाची तीन दारं उघडली, पर्यटकांची गर्दी... मात्र अनेक गावांना सतर्कतेचा इशारा - Upper Wardha Dam
  2. पुण्यात मुसळधार! अनेकांच्या घरात शिरलं पाणी; खडकवासला धरणातून यंदाचा सर्वाधिक 45 हजार क्युसेक विसर्ग - Pune Rain Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.