ETV Bharat / state

लोकप्रिय घोषणांची सरकारकडून खैरात; मोदी आवास योजनेतंर्गत राज्यात 3 लाख घरांचं होणार वाटप - Modi Awas Gharkul Yojana 2024 - MODI AWAS GHARKUL YOJANA 2024

Modi Awas Gharkul Yojana : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्याची तिजोरी खुली केली आहे. विविध योजनांच्या घोषणांपाठोपाठ आता मोदी आवास घरकुल योजनेतंर्गत 2023 ते 2026 या तीन वर्षात राज्यात 10 लाख घरं उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी 1233 कोटी 30 लाख रुपये ग्रामीण गृहनिर्माण कक्षाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Modi Awas Gharkul Yojana
मोदी आवास घरकुल योजना (Source - Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 9, 2024, 11:00 PM IST

मुंबई Modi Awas Gharkul Yojana : राज्य सरकारने 'मोदी घरकुल आवास योजने'अंतर्गत 2023-24 या वर्षाकरीता 3 लाख घरकुलांचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. त्यासाठी 3 हजार 788 कोटी 59 लाख 93 हजार 600 इतक्या निधीची आवश्यकता आहे. त्यापैकी 1 हजार 233 कोटी 30 लाख रुपये इतका निधी ग्रामीण गृहनिर्माण कक्षाला वितरीत करण्यात येणार आहे. दरम्यान त्यापैकी 26 कोटी 70 लाख इतका निधी वितरीत करण्यास शासनानं मान्यता दिली आहे.

निधीची उपलब्धता : हा निधी वितरीत करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव यांना नियंत्रक अधिकारी तसेच राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण विभागाच्या संचालकांना आहरण आणि संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. कोलाम, कातकरी आणि माडीया गोंड समाजातील पात्र कुटुंबांसाठीही आवास योजना राबविण्यात येणार आहे. 'प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान' अंतर्गत ही आवास योजना राबविण्यास शासनानं शुक्रवारी मान्यता दिली आहे. या योजनेतील पात्र भूमीहीन लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे.

काय आहेत निकष ? : पात्र कुटुंबांसाठी प्रति घरकुल 2 लाख 39 हजार, स्वच्छ भारत अभियानांतर्गत 12 हजार आणि मनरेगा अंतर्गत 27 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. या योजनेकरिता राज्य हिश्श्याचा निधी आदिवासी विकास विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. लाभार्थ्याचं कुठंही पक्कं घर नसावं, लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत नसावा, या अटी योजनेसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

  1. आनंदाची बातमी! 'लाडक्या बहिणीला' रक्षाबंधनापूर्वीच ओवाळणी मिळणार, पहिला हफ्ता 'या' दिवशी मिळणार - mazi ladki bahin yojana
  2. मुख्यमंत्र्यांची 'लाडकी बहीण' व्हायचंय? 'असा' दाखल करा ऑनलाईन अर्ज - Ladki Bahin Yojana
  3. अकोले तालुक्यात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा; पाहा व्हिडिओ - World Tribal Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.