ETV Bharat / state

कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार: निरंजन डावखरे भरणार अर्ज - Konkan Graduates Constituency 2024 - KONKAN GRADUATES CONSTITUENCY 2024

Konkan Graduates Constituency 2024 : कोकण पदविधर मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं माघार घेतली आहे. त्यामुळे भाजापाचे उमेदवार निरंजन डावखरे हे या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Konkan Graduates Constituency 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 10:29 AM IST

Updated : Jun 7, 2024, 11:24 AM IST

मुंबई Konkan Graduates Constituency 2024 : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेनं माघार घेतली आहे. भाजपाचे निरंजन डावखरे हे कोकण पदविधर मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अभिजीत पानसे यांनी अर्जही दाखल केला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर आज भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी या निवडणुकीतून मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे माघार घेत असल्याची घोषणा केली.

Konkan Graduates Constituency 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे (Reporter)

आज सकाळी शिवतीर्थावर पार पडली बैठक : आज सकाळीच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेचे अभिजीत पानसे, नितीन सरदेसाई, भाजपाचे नेते निरंजन डावखरे, भाजपा आमदार प्रसाद लाड यांची बैठक झाली. या बैठकीनंतर मनसेनं या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.

देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीला यश : कोकण पदविधर मतदार संघाच्या निवडणुकीत मनसेनं अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. उमेदवारी घोषित झाल्यानंतर अभिजीत पानसे यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत मध्यस्थी केली. त्यानंतर आज सकाळी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भाजपाचे नेते निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड यांनी भेट दिली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे, नितीन सरदेसाई आदींची उपस्थिती होती. या बेठकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.

हेही वाचा :

  1. एकनाथ शिंदेंसोबत आपला प्रासंगिक करार; कल्याण काळेंच्या जाहीर सत्कारात अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यानं खळबळ - Abdul Sattar Felicitated To Kalyan Kale
  2. 'इंडिया' आघाडी स्थापणार सरकार ? सुप्रिया सुळे म्हणाल्या 'आम्ही अद्यापही वेट अँड वॉचच्या भूमिकेत' - Supriya Sule On Government Formation
  3. एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांचं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन : शिवसेनेचे आमदार-खासदार फुटण्याच्या भीतीनं 'हे' आदेश - Shiv Sena MP At Shivaji Park

Last Updated : Jun 7, 2024, 11:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.